आर्थिक

Business Idea: कमी पैशात सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि दिवसाला कमवाल 5 हजार! आयुष्यभर नाही पडणार पैशांची कमतरता

Published by
Ajay Patil

Business Idea:- नोकरी मिळत नाही म्हणून आता काय करावे? या प्रश्नाने असंख्य तरुण-तरुणी त्रस्त आहेत. कारण सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेमध्ये मात्र उपलब्ध नोकऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी असल्यामुळे रोजगाराच्या संबंधित अनेक समस्या आजकालच्या तरुणांना भेडसावत आहेत.

त्यामुळे आता अनेक तरुण-तरुणी छोटे-मोठे व्यवसायांकडे वळू लागले आहेत. परंतु व्यवसायाची सुरुवात करताना किंवा कोणता व्यवसाय करावा? याची निवड करताना देखिल अगोदर आपल्याला गुंतवकीसाठी लागणारा पैसा आणि कोणता व्यवसाय चांगला चालू शकतो? याबद्दल विचार करणे खूप गरजेचे असते.

व्यवसाय हे अगदी छोट्या गुंतवणुकीतून देखील सुरू करता येतात. परंतु त्या व्यवसायाला मागणी किंवा त्या व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना किती मागणी आहे? या गोष्टींना देखील तितकेच महत्त्व असते व या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच व्यवसायाची निवड करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या परंतु कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल अशा व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

 एलईडी बल्ब बनवणे विक्रीचा व्यवसाय

सध्या वाढत्या वीज बिलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एलईडी बल्ब वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे एलईडी बल्ब बनवून तो विक्री करण्याचा व्यवसाय हा उत्तम पद्धतीने चालणारा व्यवसाय ठरू शकतो. विशेष म्हणजे सरकारच्या माध्यमातून याकरिता प्रशिक्षण दिले जाते व या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला आहे.

आपल्याला माहित आहे की एलईडी बल्ब टिकाऊ असतोच. तसेच तो तुटण्याची किंवा फुटण्याची भीती देखील नसते. जर आपण एका एलईडी बल्बचे साधारणपणे आयुष्य आले तर ते पन्नास हजार तास किंवा त्यापेक्षा देखील अधिक असते. त्या तुलनेत मात्र सीएफएल बल्बचे आयुष्य फक्त आठ हजार तासांपर्यंत असते. त्यामुळे एलईडी बल्बची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

 कसा सुरु कराल हा व्यवसाय?

कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक संस्था एलईडी बल्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देतात  व इतकेच नाही तर स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत देखील आता एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकतात.

या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला एलईडीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर तसेच फिटिंग टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारच्या अनुदान योजना आणि इतर अनेक महत्वाची माहिती तुम्हाला दिली जाते. तुम्हाला जर छोट्या स्वरूपामध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पन्नास हजार रुपये भांडवलात सुरू करू शकतात.

विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे शॉप वगैरे किंवा युनिट टाकण्याची गरज नसून तुम्ही अगदी घरात देखील या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.

 किती होईल या व्यवसायातून कमाई?

साधारणपणे तुम्ही जेव्हा एक एलईडी बल्ब बनवता तेव्हा त्याकरिता तुम्हाला साधारणपणे पन्नास रुपये खर्च येतो. परंतु बाजारामध्ये तुम्ही शंभर रुपयांना हा विकतात. म्हणजेच तुम्हाला दुप्पट नफा या माध्यमातून मिळतो.

समजा तुम्ही एका दिवसाला शंभर बल्ब बनवले व त्यांची विक्री करण्यात यशस्वी झाले तर तुम्ही थेट दिवसाला पाच हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच तुम्ही प्रत्येक महिन्याला एक लाख 50 हजार पर्यंत देखील कमाई या माध्यमातून करू शकता.

Ajay Patil