Malabar Gold : कधीकाळी विकायचा मसाले, कंपनी बुडाली जिद्द न हारता सुरु केला दुसरा व्यवसाय, आज हजारो कोटींचा आहे टर्नओहर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिद्द चिकाटी असेल तर असाध्य ते साध्य करता येते अशी एक म्हण आहे. एखाद्या व्यवसायात किंवा स्टार्टअप मध्ये अपयश आल्यास खचून न जाता मार्केट रिसर्च जर केले तर मनुष्य खूप मोठे ध्येय गाठू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे मलबार गोल्ड. हा आजच्या काळातील नावाजलेला ब्रँड आहे. त्याचे संस्थापक एम.पी. अहमद हे आहेत.

त्यांनी आज जे यश संपादन केले आहे त्यामागे मोठा सांघर्ष आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात – एम.पी. अहमद यांनी वयाच्या २० व्या वर्षी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी खचून जाता मार्केट रिसर्च केले आणि मग त्यांच्या लक्षात आले की भविष्यात सोने आणि दागिन्यांना भरपूर वाव आहे. तेथून त्यांनी आपली मालमत्ता विकून पैसे जमवून मलबार गोल्ड ची सुरवात केली. आज हा ब्रँड करोडो रुपयांची उलाढाल करत आहे.

नोव्हेंबर १९५७ मध्ये एम.पी. अहमद यांचा जन्म केरळमधील कोझिकोड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मम्मद कुट्टी हाजी आणि आईचे नाव फातिमा होते. लहानसा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे अहमद यांना लहानपणापासूनच व्यवसाय करण्याची इच्छा होती.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम मार्केट रिसर्च करणे गरजेचे असते. एम. पी. अहमद यांनी आपल्या जन्मगावी मलबार येथे मार्केट रिसर्च करताना त्यांना असे आढळले की, गुंतवणूक आणि सणासुदीच्या अशा दोन्ही प्रसंगांसाठी लोक सोन्यावर सर्वाधिक अवलंबून असतात. इथेच त्यांना दागिन्यांच्या व्यवसायात उतरण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी मलबार ब्रँडच्या नावाने दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. लोकांना योग्य किमतीत दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

मलबार गोल्डची कल्पना जन्माला आली होती, पण आता ती सुरू करण्यासाठी भांडवल घेण्याची गरज होती. अहमद यांनी आपल्या काही नातेवाइकांना याबाबत पटवून दिले. त्यासाठी त्याने प्लॅन बनवून आपल्या ७ नातेवाईकांची समजूत काढली. तेच आपली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये जमवून व्यवसाय सुरू केला.

इथूनच मलबार गोल्ड अँड डायमंडची सुरुवात झाली आणि १९९३ मध्ये कोझिकोडमध्ये पहिले ४०० चौरस फुटांचे दुकान उघडले.अहमद आपल्या कारागिरांच्या मदतीने सोन्याच्या विटा विकत घेऊन स्वत: दागिने बनवत असत. आपल्या अनोख्या डिझाईन आणि विविधतेने मलबार गोल्ड लवकरच लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.

त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू लागला, त्यांनी एकापाठोपाठ एक दुकाने उघडायला सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी बीआयएस हॉलमार्क केलेले दागिने विकण्यास सुरुवात केली. आज मलबार गोल्डचे भारतासह युएई, दुबई, अमेरिकेसह ११ देशांमध्ये स्टोअर्स असून ही कंपनी २७ हजार कोटींची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे.