Highest FD Rate : प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी वेळोवेळी फिक्स्ड डिपॉझिटवर ऑफर आणत असते. FD ही एक गुंतवणूक योजना आहे ज्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते, अलीकडेच काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर सामान्य गुंतवणूकदारांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपेक्षा जास्त व्याज देतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, जर तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या पैशावर जास्त परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिक एफडी योजना वृद्धांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी उत्तम पर्याय देतात.
तसेच आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत, वृद्ध लोक अशा उत्पन्नावर 50,000 रुपयांपर्यंतची कर वजावट मिळवू शकतात. त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरते. गेल्या काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. पण तुम्हाला यापेक्षाही जास्त व्याज हवे असेल तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकांबद्दल गुंतवणूक करू शकता. आज आम्ही त्याच बँकांबद्दल सांगणार आहोत…
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना एफडीवरील 3.60 टक्के ते 9.21टक्क्यांपर्यंतचे व्याज देते, या बँकेत सर्वाधिक व्याज दर 9.21 टक्के आहे, जो 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे.
जना स्मॉल फायनान्स बँक
या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेव रकमेवर 3.50 टक्के ते 9 टक्के पर्यंत व्याज दिले जाते. सर्वाधिक व्याज दर 9 टक्के आहे, जो 365 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.50 टक्के ते 9.10 टक्के व्याज देते. बँकेचा सर्वोच्च व्याज दर 9.10 टक्के आहे, जो दोन वर्षे आणि दोन दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर दिला जातो.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.50 टक्के ते 9.50 टक्के व्याज देते. तसेच 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध सर्वाधिक व्याजदर 9.50 टक्के आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.60 टक्के ते 9.10 टक्के व्याज देते आहे. सर्वाधिक व्याज दर 9.10 टक्के आहे. हे दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसह FD वर उपलब्ध आहे.