Categories: आर्थिक

मारुतीची स्कीम ! कार घेण्यासाठी कर्जाची आवश्यकता नाही ; कंपनीच देणार हप्त्यांमध्ये कार , कसे ते जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीने लोकांना कर्ज न घेता कार खरेदी करण्याची संधी दिली आहे. तथापि, या योजनेंतर्गत केवळ काही मॉडेल्स खरेदी केली जाऊ शकतात.

विक्री वाढवण्यासाठी मारुतीने ही मोहीम सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे कार खरेदीसाठी लोकांना कर्ज घेताना अनेक अडचणी येतात. लोकांच्या या अडचणी लक्षात घेता मारुतीने आपली योजना सुरू केली आहे. ही मारुती योजना काय आहे आणि त्याचा कसा फायदा घेता येईल हे आपण याठिकाणी पाहूया.

मारुतीची कोणती कार खरेदी करू शकता ते जाणून घ्या :- मारुतीने सबस्क्रिप्शन ऑफर सुरू केली आहे. याअंतर्गत कंपनी स्वतः हप्त्यांवर कार देत आहे. या योजनेअंतर्गत कंपनीने वॅगनआर, इग्निस आणि एसयूव्ही एस-क्रॉससह स्विफ्ट, डिजायर आणि विटारा ब्रेझा या गाड्यांना हप्त्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दरमहा सुलभ हप्ते देऊन लोक या गाड्या घरी आणू शकतात. यासाठी डाउन पेमेंटचीही गरज भासणार नाही.

ही योजना कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली आहे ते जाणून घ्या :- मारुतीने देशातील 8 शहरांमध्ये सब्सक्रिप्शन स्कीम सुरू केली आहे. यात दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादचा समावेश आहे. या शहरांमध्ये राहणारे लोक सबस्क्रिप्शन योजनेंतर्गत कार घेऊ शकतात. यासाठी लोक जवळच्या मारुती शोरूमशी संपर्क साधू शकतात.

मारुतीची ही स्कीम जाणून घ्या :- जर एखाद्याला सब्सक्रिप्शन ऑफर अंतर्गत वॅगन आर घ्यायची असेल तर त्याला दरमहा 12,722 रुपये हप्ता द्यावा लागेल. हा हप्ता वॅगनआरच्या बेस एलएक्सआय व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी, इग्निसच्या सिग्मा मॉडेलसाठी महिन्याच्या 13,772 रुपयांचा हप्ता भरला जाईल. हा हप्ता 48 महिन्यांचा असेल. या गाड्या घेतल्यानंतर त्यांची नंबर प्लेट पांढर्‍या रंगात येईल आणि या कार खरेदीदाराच्या नावे रजिस्टर जातील.

पैशाचे गणित समजून घ्या :- सध्या वॅगन आरची एक्स-शोरूम किंमत 4,45,500 रुपये आहे. दिल्लीत या कारची ऑनरोड किंमत 4.90 लाख रुपये आहे. जर तुम्ही 48 महिन्यांसाठी 12,722 रुपये दरमहा हप्ता भरला तर एकूण 6,10,656 रुपये होतील. म्हणजेच, 48 महिन्यांत, आपण कारच्या ऑनरोड किंमतीपेक्षा अधिक देय द्याल.

आपल्याला काय फायदा होईल हे जाणून घ्या :- आपण या योजनेंतर्गत कार खरेदी करता तेव्हा डाउन पेमेंट करण्याची आवश्यकता नसते. या व्यतिरिक्त कंपनी तुम्हाला कार विमा, देखभाल, रोड साइड एसिस्ट अशा सुविधा देईल. आपण दरमहा दिलेल्या पैशात कार विमा ते रोड साइड एसिस्ट पर्यंत सर्व काही समाविष्ट असते. मारुतीने 24, 36 आणि 48 महिन्यांसाठी सब्सक्रिप्शन योजना देखील जारी केल्या आहेत, ज्या ग्राहक स्वत: निवडू शकतात.

वेळ पूर्ण झाल्यानंतर काय ? :- मारुतीची सब्सक्रिप्शन प्लान पूर्ण झाल्यानंतर ग्राहक त्यास एक्सटेंड करू शकतात. त्याचबरोबर ग्राहकांना हवे असल्यास त्यांची कार देखील अपग्रेड करू शकतात. या व्यतिरिक्त आपण ही किंमत बाजार किंमतीनुसार देखील खरेदी करू शकता.

या ऑफरच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि अतिरिक्त सूट च्या माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता. https://www.marutisuzuki.com/subscribe

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24