Mobile Recharge Plans : जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नेहमीच वेगवेळ्या ऑफर्स आणत असतात, अशातच आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील नेहमीच आपल्या ग्रहकांसाठी एकापेक्षा एक प्लॅन लॉन्च करत असते, तुम्ही देखील एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
एअरटेल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने अनलिमिटेड डेटासह स्वस्त प्लान लॉन्च करून खळबळ उडवून दिली आहे. एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी 99 रुपयांचा अमर्यादित डेटा पॅक लॉन्च केला आहे. एअरटेलकडे वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक योजना असल्या तरी डेटा पॅक तेव्हा उपयोगी पडतात जेव्हा, जेव्हा वापरकर्ते त्यांच्या विद्यमान प्लॅनसह उपलब्ध डेटाचा कोटा संपवतात. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन आता कंपनीने 99 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे, ज्यामध्ये अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. चला तर मग या प्लॅनमध्ये काय खास आहे, आणि हा प्लॅन कसा काम करेल, जाणून घेऊया.
एअरटेलच्या ९९ रुपयांच्या पॅकवर अमर्यादित डेटा दिला जातो आहे, ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटचा मुक्तपणे वापर करू शकता. OTT वर सिरीज पाहणे असो किंवा ऑनलाइन चित्रपट. तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय यूट्यूबपासून फेसबुकपर्यंत सर्व एक्सप्लोर करू शकता. या रिचार्जवर दोन दिवसांची वैधता दिली जात आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी वापरकर्त्याने लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे एका दिवसात 20 GB डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होऊन 64Kbps होतो.
ज्या वापरकर्त्यांना वाटते की, एअरटेलच्या 99 रुपयांच्या डेटा पॅकवर 2 दिवसांची वैधता अपुरी आहे, त्यांनी लक्षात ठेवावे की अमर्यादित डेटाची ऑफर फक्त या पॅकवर उपलब्ध आहे. त्याच किंमतीच्या श्रेणीमध्ये 98 रुपयाचा डेटा पॅक देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 5 GB डेटा दिला जातो आणि विद्यमान प्लॅनच्या वैधतेमध्ये वैधता जोडली जाते.
एअरटेलकडून आणखी बरेच डेटा पॅक ऑफर केले जात आहेत. यामध्ये 301 रुपयांचा डेटा रिचार्ज देखील विशेष आहे. या प्लॅनवर 50GB डेटा उपलब्ध आहे आणि सध्याच्या वैधतेमध्ये वैधता देखील जोडली आहे. कंपनीकडे 49 रुपयांचे डेटा व्हाउचर देखील आहे. त्याची वैधता एक दिवसाची आहे आणि वापरकर्त्याला त्या अंतर्गत 6 GB डेटा मिळतो. एअरटेलच्या अशाच काही प्लॅन साठी तुम्ही एअरटेल ऍप वरून माहिती मिळवू शकता.