Mukesh Ambani : आशिया खंडातील श्रीमंत म्ह्णून ओळख असणारे मुकेश अंबानी एका नवीन कंपनीसोबत काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी चॉकलेटची असणार आहे.
लोटस या चॉकलेट कंपनीची स्थापना 1988 मध्ये झाली. ते कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते. रिलायन्स आणि लोटस यांच्यातील हा करार गेल्या वर्षी 29 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला होता.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. असे असताना रिलायन्स रिटेल एकामागून एक सौदे करून या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. आता या माध्यमातून अंबानींच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एका मोठ्या कंपनीचा समावेश झाला आहे.
74 कोटी रुपयांची डील पूर्ण
अहवालानुसार, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमधील बहुसंख्य भागभांडवल 74 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार पूर्ण केला आहे.
या करारांतर्गत, RCPL ने लोटस चॉकलेटच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्ससाठी 25 कोटी रुपये देऊन कंपनीचा ताबा घेतला आहे. 24 मे पासून कंपनीची कमान हाती घेण्यात आल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले. ओपन ऑफर अंतर्गत शेअर्स खरेदी केले आहेत.
29 डिसेंबर 2022 रोजी हा करार जाहीर करण्यात आला
RCPL ने बाजार नियामक सेबीच्या टेकओव्हर नियमांनुसार लोटसच्या इक्विटी शेअर भांडवलाच्या अतिरिक्त 26 टक्के संपादन करण्याची सार्वजनिक घोषणा केली. RRVL ही मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे आणि RIL समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. रिलायन्स आणि लोटस यांच्यातील हा करार गेल्या वर्षी 29 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला होता.
लोटसची सुरुवात 1988 मध्ये झाली
प्रकाश पी पै, अनंत पी पै आणि लोटस प्रमोटर ग्रुपच्या इतर सदस्यांनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड यांच्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
डिसेंबरमध्ये डील सुरू असताना त्यासाठी प्रति शेअर 113 रुपये किंमतही निश्चित करण्यात आली असून या दराने ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे चॉकलेट कंपनी लोटसची स्थापना 1988 मध्ये झाली होती. ते कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते.
अधिग्रहण बातमीने शेअर्समध्ये उसळी
मुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबतचा करार पूर्ण झाल्याच्या बातमीने चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी व्यवहाराच्या शेवटी, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचे समभाग 1.82 टक्क्यांनी वाढून 148.00 रुपयांवर बंद झाले.
याआधी, जेव्हा ही डील जाहीर करण्यात आली होती, तेव्हा जेव्हा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसली आणि सलग 16 दिवस त्याच्या शेअरमध्ये अपर सर्किट दिसले. लोटस चॉकलेट कंपनीने मार्च 2022 मध्ये संपलेल्या वर्षात 6 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.