Multibagger stock : तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी स्टॉक घेऊन आलो आहोत. सध्या शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने केवळ एका महिन्यात गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा दिला आहे.
मल्टीबॅगर GMR पॉवर आणि अर्बन इन्फ्रा लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 100% पेक्षा जास्त वाढले आहेत. जीएमआर पॉवरचे शेअर्स सोमवारी 46.29 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले.
स्टॉक बीएसईवरील त्याच्या मागील 42.09 रुपयांच्या बंद पातळीपेक्षा 9.98% जास्त आहे. या ऊर्जा क्षेत्रातील स्टॉकमध्ये तीन महिन्यांत 147% आणि गेल्या सहा महिन्यांत 163% वाढ झाली आहे.
अवघ्या एका महिन्यात दुप्पट परतावा
18 ऑगस्ट 2020 रोजी GMR पॉवरचे शेअर्स 22.78 रुपयांवर होते, जे गेल्या सत्रात (18 सप्टेंबर 2023) 52 आठवड्यांच्या उच्चांकी 46.29 रुपयांवर पोहोचले आणि या कालावधीत 103% परतावा दिला. या तुलनेत एका महिन्यात सेन्सेक्स 3.65% वाढला आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 2,794.04 कोटी रुपये झाले.
6 महिन्यांत स्टॉक 157 टक्क्यांनी वाढला
याशिवाय, गेल्या 6 महिन्यांच्या चार्टवर नजर टाकली तर, या कालावधीत या स्टॉकमध्ये 157.77 टक्के वाढ दिसून आली आहे. 6 महिन्यांत शेअरचे मूल्य 26.90 रुपयांनी वाढले आहे.
कोट्यवधींच्या ऑर्डरचा परिणाम
12 सप्टेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमध्ये 2470 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्याची माहिती GMR पॉवरने शेअर बाजाराला दिली आहे. GMR पॉवरची उपकंपनी असलेल्या GMR स्मार्ट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेडने पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या 2 झोनमधील 75.69 लाख स्मार्ट मीटरसाठी निविदा प्राप्त केल्या आहेत. 4 सप्टेंबर रोजीही, यूपीमधील कंपनीच्या युनिटला 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर मिळाल्यानंतर शेअर्स 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर आले होते.