Multibagger Stocks : गुंतवणूकदार झाले मालामाल ! या शेअर्समध्ये 22000 रुपयांचे झाले करोडो रुपये, अजूनही बंपर कमाईची संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये अनेकजण पैशांची गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटमधील पैशांची गुंतवणूक जेवढी फायद्याची आहे तितकीच जोखमीची देखील आहे. अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमवत आहेत.

NMDC देशातील सर्वात मोठी लोहखनिज खाण कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 5 जानेवारी रोजी एनएमडीसीचे शेअर्स उच्चांकावर पोहोचला होता मात्र आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरून 222.65 रुपयांवर बंद झाला आहे.

NMDC च्या शेअर्सने गुंतवणूकदारना मालामाल केले आहे. दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना 22 हजार रुपयांमध्ये करोडो रुपयांचा नफा मिळाला आहे. 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या शेअर्सने दुप्पट परतावा दिला आहे. कंपनीची सध्याची स्थिती मजबूत असल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची अजूनही संधी आहे. सध्याच्या स्थितीपेक्षा हा शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो.

NMDC च्या शेअर्सची 2 फेब्रुवारी 2001 रोजी किंमत 47 पैसे होती. 5 जानेवारी रोजी एनएमडीसीचे शेअर्स 222.65 रुपयांवर बंद झाले आहेत. गुंतवणूकदारांनी 23 वर्षात केवळ 22 हजार रुपये गुंतवून करोडोंचा नफा मिळवला आहे.

दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना या शेअर्समधून चांगला नफा मिळाला आहे. 19 मे 2023 रोजी NMDC च्या शेअर्सची किंमत 103.75 रुपये होती. 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत NMDC चे शेअर्स 119 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. सध्या उच्चांकापेक्षा हा शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक खाली आला आहे.

NMDC मध्ये सध्या गुंतवणूक करावी का?

NMDC च्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. NMDC या लोहखनिज उत्पादन वार्षिक 18 टक्क्यांनी वाढून 31.8 मेट्रिक टन झाले आहे. 24 टक्के वाढीसह विक्रीचे प्रमाण 32 मेट्रिक टनांवर गेले आहे.

लवकरच या कंपनीचे उत्पादन 47-49 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये या कंपनीचे उत्पादन 23-28 टक्के वाढू शकते. त्यामुळे या शेअर्समध्ये अजूनही गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. मात्र या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.