Name Astrology : आता नावावरून समजेल तुमचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

Ahilyanagarlive24 office
Published:

Name Astrology : ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. या प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तसेच त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये 5 वे नक्षत्र अतिशय शुभ आणि विशेष मानले जाते.

या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती सुखाने जीवन जगत असतात. परंतु अनेकांना आपले नक्षत्र आणि जन्म राशी माहिती नसते. जर तुम्हालाही तुमचे नक्षत्र आणि रास माहिती नसेल तर तुम्ही ती सोप्या प्रकारे जाणून घेऊ शकता. पहा सविस्तर.

प्रत्येकाच्या आयुष्यात नावाचा खूप प्रभाव पडत असतो. कारण त्या व्यक्तीचे नाव हीच त्याची ओळख असते. जर नावच नसते तर जगात कोणीही ओळखले नसते. तसेच जर तुमची कुंडली नसेल आणि तुम्हाला तुमच्या राशीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला तुमच्या नावाच्या अक्षरावरून सर्व काही जाणून घेता येईल.

अशीच जन्म राशीचे नक्षत्र आणि नावानुसार राशी आहेत ज्यावरून तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमची जन्म राशी आणि तुमचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला हे तुम्हाला समजेल.

नावावरून जन्म राशी आणि नक्षत्र पहा

ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आणि 27 नक्षत्र असून प्रत्येक राशीमध्ये 2 किंवा 3 नक्षत्र असतात. तसेच प्रत्येक नक्षत्राचे ४ भाग असतात. जन्मावेळी चंद्र ज्या नक्षत्र आणि राशीत असतो त्या नक्षत्राच्या आधारावर जन्माचे नाव ठेवण्यात येते. इतकेच नाही तर याला जन्म चिन्ह असे म्हटले जाते.

राशी नक्षत्र नावाचे पहिले अक्षर
मेषअश्विनि, भरणी, कृतिकाचू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ
वृषकृतिका, रोहिणी, मृगशिराई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुनमृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसुका, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्कपुनर्वसु, पुष्य, अश्लेषाही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंहमघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनीमा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्याउत्तराफाल्गुनी, हस्त, चित्राढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळचित्रा, स्वाती, विशाखारा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिकविशाखा, अनुराधा, ज्येष्ठातो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनुमूल, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ाये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकरउत्तराषाढ़ा, श्रवण, घनिष्ठाभो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभघनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदगू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीनपूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवतीदी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe