बरेच व्यक्तींची इच्छा खूप काहीतरी भव्य दिव्य आणि मोठे करण्याचे असते. परंतु बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती किंवा इतर बाबींमुळे ते शक्य होत नाही व नाईलाजाने त्यांना आवडत नसताना एखाद्या ठिकाणी काम करावे लागते. परंतु असे व्यक्ती काम तर करतात परंतु त्यांच्या डोक्यात त्यांचे जे काही ध्येय असते त्याबद्दलचे विचार सतत चालू असतात.
विचारच नाही तर त्या दिशेने ते हळूहळू काम देखील करत असतात व कालांतराने यामध्ये खूप मोठी झेप घेतात व मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात. यामागे त्यांचा प्रचंड प्रमाणात असलेला कष्ट तसेच मेहनत आणि अभ्यास, ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द व प्रयत्नातील सातत्य देखील कामी येते. याच अनुषंगाने आपण शेअर मार्केट ट्रेडिंगमधील एक प्रसिद्ध नाव असलेले निखिल कामत यांची यशोगाथा पाहिली तर ती काहीशी अशीच आहे.
निखिल कामत यांची यशाची कहाणी
जर आपण शेअर बाजारातील ब्रोकरेज कंपन्यांचा विचार केला तर यामध्ये झिरोधा हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. या कंपनीने या क्षेत्रात अनेक मोठ्या मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना पिछाडीवर टाकले असून आज या कंपनीचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. हा देशातील पहिला डिस्काउंट ब्रोकरेज फर्म असून याची सुरुवात नितीन आणि निखिल कामात या बंधूंनी केली.
यामध्ये निखिल कामत यांचा विचार केला तर आज स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांची झिरोधा ही कंपनी सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी असून शेअर मार्केटमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु या कंपनी निर्मितीच्या अगोदर चा निखिल कामात यांचा प्रवास पाहिला तर खूप प्रेरणादायी असा आहे.निखिल कामत यांनी सतराव्या वर्षी शिक्षण सोडले व काहीतरी काम करावे या उद्देशाने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली व त्या ठिकाणी त्यांना आठ हजार रुपये दरमहा पगार मिळत होता.
परंतु हे काम करत असताना त्यांनी शहर मार्केट ट्रेडिंगकडे लक्ष वळवले व ट्रेडिंग करणे सुरू केले. एका वर्षामध्ये यातले खाचखळगे शिकून अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासूपणाने त्यांनी ट्रेडिंग सुरू केली व आज ते या व्यवसायात यशाच्या शिखरावर असून त्यांनी प्रचंड प्रमाणात यश मिळवले आहे. निखिल कामात यांच्या वडिलांनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये थोडीफार आर्थिक मदत केली व त्यातूनच त्यांनी सगळे व्यवस्थापन केले.
वडिलांची थोडीफार जी काही बचत होती त्यातील काही पैसे त्यांनी निखिल कामत यांना दिले व याच पैशांच्या जोरावर ते शेअर बाजारात दाखल झाले. वडिलांनी जमा केलेली बचत व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी निखिल यांच्यावर आली व त्यांनी हळूहळू त्या पद्धतीने पावले टाकत मार्केटवर व्यवस्थितपणे पकड मिळवायला सुरुवात केली
व काही काळानंतर ते त्यांच्या व्यवस्थापकाला शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात यशस्वी झाले व याचा फायदा त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापकाला झाला व त्यानंतर निखिल यांना मॅनेज करण्याकरिता इतर लोकांकडून पैसे घेतले.
अशाप्रकारे केली झिरोधाची सुरुवात
निखिल कामत यांना प्रत्येक बाबतीत त्यांच्या वडिलांकडून भरपूर सहकार्य मिळाले. निखिल यांनी कॉल सेंटरमध्ये त्यांच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांना पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थित पटवून दिले व अशाप्रकारे त्यांनी स्टॉक ब्रोकिंग मधील कारकिर्दीला सुरुवात केली व या माध्यमातून त्यांनी सन 2010 मध्ये झिरोधा लॉन्च केली व साधारणपणे 2021 म्हणजेच 11 वर्षांनी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी ते अब्जाधीश बनले.
या कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला कोणीही फंडिंग केलेले नाही व या कंपनीमध्ये कोणी बाहेरच्या व्यक्तीने पैसे देखील इन्वेस्ट केलेले नाहीत. परंतु असे असताना देखील ही कंपनी आज हजारो कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. यावरून आपल्याला दिसून येते की व्यक्तीमध्ये मेहनत आणि जिद्द, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असली तर यश नक्कीच मिळते.