आर्थिक

Noise ColorFit Thrive : लाँच झाले ब्लूटूथ कॉलिंग फीचर असणारे ‘हे’ स्वस्त स्मार्टवॉच; 7 दिवस टिकेल बॅटरी, किंमत आहे फक्त..

Published by
Ahmednagarlive24 Office

Noise ColorFit Thrive : जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय बाजारात Noise ने आपले एक शानदार स्मार्टवॉच लाँच केले आहे. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे.

कंपनीने आपले नवीन Noise ColorFit Thrive स्मार्टवॉच बाजारात आणले आहे. कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि हार्ट रेट सेन्सर तसेच 1.85-इंच HD TFT डिस्प्ले पाहायला मिळेल. किमतीचा विचार केला तर याची किंमत 1299 रुपये इतकी आहे.

या स्मार्टवॉचची बॅटरी 7 दिवस टिकेल असा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे. कंपनी या स्मार्टवॉचवर अनेक दिवसांपासून काम करत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हे स्मार्टवॉच उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या डिटेल्स.

जाणून घ्या Noise ColorFit Thrive चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून या स्मार्टवॉचमध्ये 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.85-इंच HD TFT डिस्प्ले देण्यात येत आहे. तर या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतील. आता तुम्ही तुमच्या मूड आणि स्टाईलनुसार ते सेट करू शकता. नॉइजचे हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग देखील देते. या स्मार्टवॉचच्या ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टची रेंज 10 मीटरपर्यंत आहे. वॉचमध्ये देण्यात आलेला AI व्हॉईस असिस्टंट युजर्सची सोय आणखी वाढवतो. तर कंपनीकडून नवीन स्मार्टवॉचमध्ये अनेक महत्त्वाचे हार्ट सेन्सर देखील देण्यात येत आहे.

कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंगसह SpO2 आणि स्लीप ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. तसेच यामध्ये अनेक वर्कआउट मोडही दिले आहेत. कंपनीकडून स्मार्टवॉचमध्ये अंगभूत गेम्स, डिस्प्ले नोटिफिकेशन्स, वेदर अपडेट्स सोबत कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल्सचा पर्याय देण्यात आला आहे. हे नॉइज वॉच उत्तम बॅटरी बॅकअपसह तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनीचा दावा आहे की हे स्मार्टवॉच पूर्ण चार्ज झाल्यानंतर ते ब्लूटूथ कॉलिंगशिवाय 7 दिवस चालू शकते. तर त्याच वेळी, ब्लूटूथ कॉलिंगसह स्मार्टवॉच 2 दिवस टिकते. तुम्हाला कंपनीचे हे स्मार्टवॉच मिडनाईट ब्लू, काम ब्लू, सिल्व्हर ग्रे आणि कोरल या रंगात खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office