आर्थिक

8th Pay Commission: केंद्रात सरकारची स्थापना झाली आणि आता होईल 8 व्या वेतन आयोगाची तयारी; कर्मचाऱ्यांचा पगारात होईल 8 ते 26 हजारपर्यंत वाढ?

Published by
Ajay Patil

8th Pay Commission:- केंद्रात लोकसभा निवडणुका संपल्या व त्यानंतर कालच देशाचे तिसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आता सरकार स्थापन झाले व त्यानंतर आता नागरिक आणि देशातील केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

यामध्ये जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा असलेल्या आठवा वेतन आयोग स्थापन केला जाईल अशी चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे व त्यासंबंधीच्या अनेक बातम्या देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आपल्याला दिसून येत आहेत.

वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या माध्यमातून तर दहा वर्षांनी लागू केला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळत आहेत ते सध्या सातव्या वेतन आयोगानुसार मिळत असून  केंद्र सरकारच्या माध्यमातून जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता व आता लवकरच नवे सरकार आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 कधी होईल आठवा वेतन आयोग लागू?

देशातील जवळपास एक कोटी पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने आठव्या वेतन आयोग स्थापना होण्याची वाट पाहत आहेत. जेव्हा हा आयोग स्थापन केला जाईल तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत आपल्या शिफारसी सरकारला सादर करणार आहे. वेतन आयोग स्थापन केल्यानंतर या आयोगाने सादर केलेल्या शिफारसी या जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतात.

 सरकार लवकरच घेऊ शकते याबाबत निर्णय

तसे पाहायला गेले तर अद्याप पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाची निर्मिती आणि अंमलबजावणीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. डिसेंबर मध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले होते की, सध्या आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणत्याही प्रकारची योजना नाही.

परंतु आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या असून केंद्रात नवीन सरकार स्थापन झालेले आहे व अशा परिस्थितीमध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केला जाईल या दिशेने सरकार निर्णायक पावले उचलेल अशी दाट  शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 आठवा वेतन आयोग स्थापनेनंतर होईल पगारात वाढ

जर केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग स्थापन केला गेला तर त्याचा फायदा देशातील 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. आठवा वेतन आयोग स्थापन केल्यानंतर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होईलच परंतु त्यासोबत कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

याबाबत जर आपण फायनान्शिअल एक्सप्रेसचा अहवाल बघितला तर त्यानुसार आठवा वेतन आयोग स्थापन केला गेल्यानंतर फिटमेंट फॅक्टर 3.68 पट केला जाईल अशी शक्यता आहे. यानुसार एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे पगारात आठ ते 26 हजार रुपयांची वाढ होईल.

कारण जेव्हा सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता तेव्हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता व त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 14.29% वाढ करण्यात आलेली होती.

Ajay Patil