आर्थिक

पुणे रिंगरोड भूसंपादनाबाबत खेड व हवेली तालुक्यातील ‘या’ गावांच्या शेतकऱ्यांना लागली लॉटरी! भूसंपादनाचा पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा

Published by
Ajay Patil

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या पुणे रिंग रोडचे काम हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहेत. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रकल्प असून हा रिंग रोड 172 किलोमीटर आणि ११० मीटर रुंदी असलेला प्रकल्प असून पश्चिम व पूर्व अशा दोन भागात त्याचे विभाजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये पूर्व भागातील काही तालुक्यातील गावांचा समावेश आहे तर पश्चिम भागातील तालुक्यातील गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाचे स्थिती पाहिली तर आतापर्यंत पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी एकतीस गावांमधील जवळपास 644 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालेले आहे व त्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना तब्बल 2975 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

पश्चिम मार्गामध्ये भोर तालुक्यातील एक, हवेली तालुक्यातील 11, मुळशी  तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील 6 अशी गावे बाधित होणार आहेत. पूर्व भागातील मावळ तालुक्यातील 11, खेड तालुक्यातील बारा आणि हवेलीतील 15, पुरंदर तालुक्यातील पाच आणि भोर तालुक्यातील तीन गावातून हा रस्ता प्रस्तावित आहे.

पश्चिम भागातील भूसंपादनासाठी या अगोदर गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून दहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात आलेले आहे व त्यातून पश्चिम मार्गाचे बहुतेक भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागली आहे. परंतु पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निधीची गरज होती

व यासंबंधी आवश्यक असलेल्या निधीची मागणी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात आलेले होती व त्या मागणीला प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये तब्बल दहा हजार 519 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

 या गावातील निवाडे जाहीर

त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पूर्व मार्गातील महत्वाच्या असल्याने खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनीच्या संपादनाबाबत निवाडे जाहीर करण्यात आलेला आहेत. यामध्ये…

 हवेली तालुक्यातील मौजे बिवरी, वाडे बोल्हाई या गावांचा समावेश आहे.

 खेड तालुक्यातील सोळु, निघोजे, मोई, मरकळ, खालुम्ब्रे, कुरुळी, गोळेगाव, केळगाव,चऱ्होली, आळंदी आणि चिंबळी इत्यादी गावांचा समावेश आहे.

 कोणत्या तालुक्यासाठी किती पैसा झाला मंजूर?

आता या तालुक्यातील गावातील निवाडे जाहीर करण्यात आलेले असून यामध्ये भूसंपादनापोटी खेड तालुक्यातील गावांकरिता 476 कोटी 72 लाख रुपये तर हवेली तालुक्यातील गावांकरिता 64 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

Ajay Patil