आर्थिक

Farmer Loan: शेतकऱ्यांना शेतीसाठी ताबडतोब होईल पैसा उपलब्ध! 10 मिनिटात मिळणार दीड लाख रुपये कर्ज, काय आहे सरकारचा प्लॅनिंग?

Published by
Ajay Patil

Farmer Loan:- शेतीसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे हे शेती उत्पादनाच्या बाबतीत आणि शेतीच्या हंगामाच्या नियोजनाच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होते व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.

अशाप्रसंगी पुढील हंगामाची तयारी करण्याकरता शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासते. त्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकार किंवा बँकांचा आधार घेतात. परंतु जर आपण बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप पाहिले तर शेतकऱ्यांना बऱ्याचदा बँकांची उंबरे झीजवावे लागतात.

परंतु वेळेवर कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे पैशा अभावी पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती उद्भवते. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून अधिक सुलभ आणि तात्काळ स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळावे या दृष्टिकोनातून एक प्रयोग हाती घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयापर्यंत सहजासहजी कर्ज उपलब्ध होणार आहे.

 केंद्र सरकारकडून हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर देशभर राबवला जाणार

या प्रयोगाकरिता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे सुरुवातीला संपूर्ण देशात या दोन जिल्ह्यांची निवड या प्रयोगाकरिता करण्यात आलेली आहे.

या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून देखील युद्धपातळीवर यासंबंधीचे काम सुरू असून  बीड जिल्ह्यात राज्य सरकारच्या ईपीक पाहणी आणि जमिनीच्या नोंदीचा आधार घेतला जात आहे.

या आधारेच शेतकऱ्यांचा जमिनीचा सातबारा उतारे त्यांच्या आधार कार्ड सोबत जोडले जात असून बीड जिल्ह्यात यासंबंधीचे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळेल अशी अपेक्षा आहे.

 हे एप्लीकेशन करेल शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मिळावे व ही संपूर्ण प्रक्रिया ताबडतोब पूर्ण व्हावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲग्री स्टॅक हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले असून शेतकऱ्यांना जेव्हा कर्ज लागेल तेव्हा संबंधित बँक आणि शेतकरी यांना एकाच क्लिकवर शेतकऱ्यांची माहिती मिळण्यास या माध्यमातून मदत होणार आहे.

सध्या ऑनलाईन पद्धतीने शेतकरी पिकांची नोंदणी करत असतात व केंद्र सरकारकडून देशभरात या एकाच ॲप मधून पिकांची नोंदणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे असेल त्या शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक हे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे

व त्यामध्ये नाव आणि आधार क्रमांक टाकून पडताळणी केली जाईल व शेतकऱ्यांच्या चेहऱ्याची ओळख देखील पटवली जाईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर या ॲप्लिकेशन मध्ये शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जाच्या ऑफर्स दिसतील व या दिसणाऱ्या ऑफर्सनुसार शेतकऱ्यांना

जितक्या कर्जाची गरज असेल तितकी ऑफर स्वीकारून त्यावर एक क्लिक केले की दहा मिनिटात बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.

Ajay Patil