अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवर विविध कर जोडलेले असतात. त्यामुळे त्याच्या किमती वाढत असतात. आता एक राज्य सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवरील नव्या करांसंदर्भात विचार करत आहे. मध्य प्रदेश सरकारचा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवर ‘गाय उपकर’ लावण्याचा मानस आहे.
त्याचा थेट भार राज्यातील जनतेवर पडणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकार इंधनावर गाई उपकर लावण्याचा विचार करीत आहे. यातून वर्षाकाठी किमान 200 कोटी रुपये मिळण्याची सरकारची अपेक्षा आहे.
हे पैसे कुठे वापरले जातील? :- मध्य प्रदेशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा उपकर गोवंशासाठी वापरला जाईल. पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आधीपासूनच गाय उपकर गोळा केला जात आहे. एका वृत्तानुसार, राज्य पशुपालन विभागाने मध्य प्रदेशातही गाई उपकर सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
किती असेल गाय उपकर ? :- पशुसंवर्धन विभागाने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवर प्रतिलिटर 15-15 पैसे आणि एलपीजी सिलिंडरसाठी 10 रुपये उपकर प्रस्तावित केला आहे. पेट्रोल आणि डिझेल उपकरातून राज्यात वर्षाला 120 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे, तर सिलिंडर्सवरील शुल्क दरवर्षी 83 कोटी रुपये आणेल. सीएम चौहान यांनी 20 नोव्हेंबर रोजी स्थापन केलेल्या गाय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान घेतल्यानंतर गौमाता कर लावण्याच्या संभाव्य निर्णयामागील ‘भारतीय संस्कृती’ असल्याचे नमूद केले.
शिवराजसिंह काय म्हणाले :- शिवराज सिंह म्हणाले की, गौमातांच्या कल्याणसाठी आणि गौशालाच्या उन्नतीसाठी मी काही किरकोळ कर लावण्याचा विचार करीत आहे. ते म्हणाले की गायींना पहिली ‘रोटी’ खायला घालायचे. शेवटची भाकरी कुत्र्यांना खायला घालायचे. भारतीय संस्कृतीत प्राण्यांसाठी जी व्यवस्था होती ती आता अदृश्य होत आहे, म्हणून आम्ही गायींसाठी लोकांकडून छोटा कर आकारण्याचा विचार करीत आहोत.
पेट्रो डिझलवर किती असतो टॅक्स :- आता आपण पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांद्वारे भरल्या जणाऱ्या कर बद्दल बोलूया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पेट्रोलच्या एकूण किंमतीच्या सुमारे 55.5% दराने कर आकारला जातो. त्याचवेळी डिझेलच्याबाबतीत 47.3 टक्के कर असतो