NPS Calculator:- भविष्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट कोसळले तरीदेखील तुमच्याकडे हवा तितका पैसा असणे खूप गरजेचे असते व त्याकरिता तुम्हाला आतापासूनच नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. आयुष्याच्या उतारवयामध्ये आपल्याला पैशाच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहायचे नसेल तर आतापासून गुंतवणुकीच्या परफेक्ट प्लॅनिंग बनवून त्यानुसार तुम्ही गुंतवणूक सुरू करणे ही काळाची गरज आहे.
अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी बाजारामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व त्यातीलच एक जर गुंतवणूक पर्याय बघितला तर ती म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस ही योजना होय.
तुमच्या पत्नीच्या नावे म्हणजेच तुमची पत्नी भविष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण राहावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्या नावे या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात.
या योजनेमधील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा जर बघितला तर तो म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला यामध्ये पेन्शन मिळते व तुम्हाला किती पेन्शन मिळवायची आहे हे देखील तुम्ही ठरवू शकतात.
एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पत्नीच्या नावे उघडा खाते
तुम्हाला जर तुमच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने नॅशनल पेन्शन स्कीमअंतर्गत खाते उघडू शकतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा आर्थिक बजेट व सोयीनुसार तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात.
तुम्हाला जर तुमच्या पत्नीच्या नावे खाते उघडायचे असेल तर किमान एक हजार रुपयांमध्ये देखील तुम्हाला खाते उघडता येणे शक्य आहे.
ही योजना म्हणजेच या योजनेत उघडलेले खाते वयाच्या साठाव्या वर्षी परिपक्व होते व नवीन नियमानुसार बघितले तर जेव्हा तुमच्या पत्नीचे वय 65 वर्षे होईल तोपर्यंतच तुम्हाला या योजनेत खाते सुरु ठेवता येऊ शकते.
अशा पद्धतीने मिळतो एक कोटींचा परतावा
समजा तुमच्या पत्नीचे वय तीस वर्षे आहे व तुम्ही त्यांच्या खात्यात दरमहा पाच हजार रुपयांची गुंतवणूक करतात. या केलेल्या गुंतवणुकीवर जर वार्षिक तुम्हाला दहा टक्क्यांचा परतावा मिळाला तर तुमच्या पत्नीचे वय जेव्हा साठ वर्षे होईल तेव्हा तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये जमा होतील व यातून तिला अंदाजे 45 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे
व सोबतच प्रत्येक महिन्याला सुमारे 45 हजार रुपयांची पेन्शन देखील मिळण्यास सुरुवात होईल व ही पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळत राहील. म्हणजे सोप्या पद्धतीत समजायचे असेल तर तुमच्या पत्नीच्या वयाच्या तिसाव्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली व यामध्ये तीस वर्षे कालावधीसाठी तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये जमा करत गेलात
व यावर जर तुम्हाला दहा टक्क्यांचा अंदाजित परतावा मिळाला तर एकूण पेन्शन फंड एक कोटी अकरा लाख 98 हजार 471 रुपये जमा होतो. यातील तुम्हाला मॅच्युरिटीवर 4,479,388 रुपये आणि 6,719,083 रुपये काढता येतात आणि 44 हजार 793 रुपये मासिक पेन्शन सुरू होते.
मिळतो कर सवलतीचा लाभ
या योजनेतील गुंतवणुकीवर दोन लाख रुपयांपर्यंत कर वजावट आणि एकूण गुंतवणुकीतील 60 टक्के रक्कम काढली तर कर सवलत यासारखे टॅक्स बेनिफिट देखील मिळतात. इतकेच नाहीतर या योजनेत दीड लाख रुपयांची मर्यादा संपल्यानंतर 50 हजार रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक देखील कर वजावटीस पात्र ठरते.
म्हणजेच दीड लाख आणि हे 50 हजार असे मिळून दरवर्षी दोन लाख रुपयापर्यंत कर बचत होऊ शकते.या योजनेच्या परताव्याच्या अनुषंगाने बघितले तर फायनान्शिअल प्लॅनर्सच्या मते सुरुवातीपासून या योजनेने सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असल्याने या योजनेतील गुंतवणूक संपूर्णपणे सुरक्षित राहते.