आर्थिक

Insurance Policy: 30 वर्ष वयाचे झाले असाल तर डोळे उघडा! आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘या’ 4 विमा पॉलिसी तुमच्याकडे असायला हव्या

Published by
Ajay Patil

Insurance Policy:- भविष्यातील आर्थिक सुरक्षितता व बचतीचे एक प्रमुख साधन म्हणून आता मध्यमवर्गीय व्यक्तींकरिता विमा पॉलिसी किंवा विमा पॉलिसी मधील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरताना दिसून येत आहे. जेव्हा आयुष्य जगत असताना व्यक्तीवर विपरीत वेळ येते तेव्हा आपल्याला विमा पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून मदत करीत असते व कुटुंबाला देखील आर्थिक सुरक्षितता प्रदान करते.

याविषयी गुंतवणूक तज्ञ म्हणतात की, वयाची तीस वर्षे पूर्ण केली असतील तर तुमच्याकडे विविध प्रकारच्या महत्त्वाच्या विमा पॉलिसी असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य यामुळे खूप सुरक्षित होते. या अनुषंगाने आपण या लेखात अशा चार प्रमुख प्रकारच्या विमा पॉलिसी बघू ज्या तुम्हाला तीस वर्षाच्या वयात गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील.

 वयाची तीस वर्षे पूर्ण केली असतील तर या विमा पॉलिसी ठरतील फायद्याच्या

1- जीवन विमा योजना जेव्हा तुम्ही वयाची तीस वर्षे पूर्ण कराल तेव्हा तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये जीवन विमा ही सर्वात महत्त्वाची गरज असते. कारण वयाचा हा टप्पात व्यक्तीवर जास्त जबाबदाऱ्या आणि त्याच्यावर अवलंबून असल्याचे संख्या जास्त प्रमाणात असते. मुदत विमा योजना तुमच्या कुटुंबाला अनिश्चित काळात तुमच्या अनुपस्थितीत देखील आर्थिक संरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.

जीवन विमा हे किफायतशीर आणि सोपी योजना असून इतर जीवन विमा उत्पादनांच्या तुलनेमध्ये ती परवडणारी आहे. समजा दुर्दैवाने जर यामध्ये मृत्यू झाला तर टर्म इन्शुरन्स प्लान तुमच्या कुटुंबाला आर्थिक कवच देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते व कुटुंबाला तुमच्या नंतर त्यांचे सामान्य जीवन आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम ठेवण्यास मदत होते.

या माध्यमातून लाभार्थीला मिळालेली रक्कम तो त्याच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि इतर कोणत्याही जीवनातील आवश्यक खर्चासाठी वापरू शकतो.

2- हेल्थ इन्शुरन्स जीवनामध्ये कुणावर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण आधीपासूनच तयारीत असणे खूप गरजेचे असते. याकरिता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही एक वरदान ठरू शकते. हेल्थ इन्शुरन्स मुळे कोणत्याही अचानकपणे उद्भवलेल्या आजारपणामुळे होणारा वैद्यकीय खर्च कव्हर होतो. यामध्ये हॉस्पिटलचा खर्च तसेच औषधांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला इत्यादी खर्चाचा समावेश होतो.

त्यामुळे तुम्ही वयाच्या या टप्प्यात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणे खूप गरजेचे आहे.  हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत हॉस्पिटल मधील उपचारांचा खर्च कव्हर केला जातो. संपूर्ण खर्च विमा कंपन्या देतात.

यातील बहुतेक मेडिक्लेम योजना पॉलिसीधारक आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना देखील कव्हर प्रदान करतात. आजकाल असलेल्या महागड्या उपचारांच्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणे खूप गरजेचे आहे.

3- दीर्घकालीन अपंगत्व विमा संरक्षण दीर्घकालीन अपंगत्व विमा एखाद्या गंभीर अपंगत्वने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी वरदान आहे. अपघातामुळे एखादा व्यक्ती काम करू शकत नाही आणि काही पैसे कमवू शकत नाही. आजारपणामुळे, अपघातामुळे  किंवा कोणत्याही दुखापतीमुळे एखाद्या कर्मचाऱ्याने दीर्घ कालावधीसाठी त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत गमावल्यास दीर्घकालीन अपंगत्व विमा त्याला आर्थिक संरक्षण देतो.

तज्ञांच्या मते बघितले तर दीर्घकालीन अपंगत्व विमा कर्मचाऱ्याला त्याच्या उत्पन्नाची टक्केवारी मिळण्याची खात्री देतो. या प्रकारची विमा पॉलिसी एखाद्या कर्मचाऱ्याला केवळ वैयक्तिक अपघात झाल्यासच कवर करते.

4- गृह विमा पॉलिसी जसे विमा पॉलिसीच्या माध्यमातून आपण स्वतःचे व कुटुंबाचे आर्थिक दृष्टिकोनातून संरक्षण करतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराचे देखील चोरी किंवा नुकसान यासारख्या आपत्तीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते याकरिता तुम्हाला होम इन्शुरन्स पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून संरक्षण देते.

होम इन्शुरन्स पॉलिसीचे त्यांनी केलेल्या कव्हरच्या प्रकारानुसार दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. हे नुकसानीचे कव्हर आणि दायितवांसाठी कव्हर आहेत. यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब अशी असते की ही विमा पॉलिसी जोखीम कव्हरेज करिता असते आणि ती परतावा देण्याच्या उद्देशाने नसते. या गृहविमा पॉलिसी तून तुम्हाला परतावा मिळत नाही.

Ajay Patil