Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. येथे मिळणार व्याजदर देखील खूप जास्त आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करून तुमचे पैसे आरामात दुप्पट करू शकता, पोस्टाकडून अशा अनेक योजना ऑफर करण्यात आल्या आहेत, ज्या पैसे दुप्पट करण्याचा पर्याय देतात. आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीसाठी किसान विकास पत्रावर 7.5 टक्के व्याज जाहीर केले आहे. यानुसार तुम्ही किसान विकास पत्रामध्ये 115 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे दुप्पट होतील.
उदाहरणार्थ, आज जर एखाद्या व्यक्तीने किसान विकास पत्रामध्ये 115 महिन्यांसाठी एक लाख रुपये गुंतवले तर परिपक्वतेवर त्या व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतील. व्याजदरात वाढ होण्यापूर्वी किसान विकास पत्रातील पैसे 123 महिन्यांत दुप्पट होत असत, परंतु व्याजदर वाढल्याने पैसे दुप्पट करण्याचा कालावधी कमी होत गेला आणि आता 115 मध्ये पैसे दुप्पट होत आहेत.
या योजनेत तुम्ही 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. येथे जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला किसान विकास पत्रामध्ये कर सवलतीचा देखील लाभ मिळतो.
आयकराच्या कलम 80C अंतर्गत, शेतकरी एका आर्थिक वर्षात किसान विकास पत्रामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळवू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले देखील KVP मध्ये खाते उघडू शकतात.
किसान विकास पत्र मध्ये खाते कसे उघडायचे?
किसान विकास पत्र योजनेत खाते उघडण्यासाठी, तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही किसान विकास पत्रमध्ये खाते सहजपणे उघडू शकता.