Passive Income:- आयुष्यामध्ये नोकरी किंवा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपल्याला पैसा मिळत असतो. याकरता आपल्याला नियमितपणे नोकरीच्या ठिकाणी जावे लागते आणि व्यवसाय असला तरी आपल्याला दररोज व्यवसायाच्या ठिकाणी जावे लागते. परंतु या पद्धतीमध्ये जर आपण नोकरीवर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गेलो नाही तर मात्र आपल्याला मिळणारा पैसा हा बंद होतो.
हे आपल्याला माहिती आहे. परंतु या तुलनेत ‘पॅसिव्ह इन्कम’ हा पर्याय खूप महत्त्वाचा असून या मध्ये तुम्ही एकदा जरी काम केले तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यभर पैसे मिळत राहतात. या संकल्पनेशी निगडित जे व्यवसायाचे मार्ग आहेत ते बहुतांशी तंत्रज्ञानाशी निगडित आहेत.
या संकल्पनेमध्ये तुम्हाला एकदा केलेल्या कामांमध्ये पुन्हा पुन्हा सहभागी व्हायची आवश्यकता भासत नाही व नियमितपणे तुमचे उत्पन्न जमा होत राहते व यालाच पॅसिव्ह इन्कम असे म्हणतात. तुम्ही अगदी कुठे फिरायला गेलात किंवा नुसते झोपून जरी राहिला तरी तुमची उत्पन्न तुम्हाला मिळत राहते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या लेखकाने एखादे पुस्तक लिहिले व ते एखाद्या प्रकाशकाकडून प्रकाशित केले तर त्या पुस्तकाचे आवृत्ती निघतच राहतात व प्रत्येकावर त्या लेखकाला त्याची रॉयल्टी मिळत राहते. यालाच पॅसिव्ह इन्कम असे म्हणतात. अगदी याच पद्धतीने आपण पॅसिव्ह इन्कमचे इतर काही पर्याय पाहू.
एकदाच करा हे काम आणि आयुष्यभर पैसे मिळवा
1- ब्लॉग किंवा वेबसाईट– यामध्ये तुम्ही स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करू शकतात व त्यावर तुमचे लेखन प्रसिद्ध करू शकतात. तुमची वेबसाईट किंवा ब्लॉगची सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून वाचक जोडू शकतात व त्यानंतर तुमच्या वेबसाईटवर गुगल जाहिराती किंवा अन्य माध्यमातून जाहिराती किंवा स्वतः जाहिराती मिळवू शकतात.
परंतु यामध्ये वाचकांना आवडेल असे लेखन करणे खूप गरजेचे असते व त्यामध्ये सातत्य ठेवावे. एवढेच नाही तर तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लेटफॉर्म कंपन्यांचे अफीलिएट होऊन त्यांचे उत्पादन देखील विकू शकतात. जेव्हा तुमचा वाचक ही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करतो तेव्हा तो प्रत्यक्ष खरेदी ॲमेझॉन किंवा flipkart वरून करत असतो. परंतु या माध्यमातून तुम्हाला कमिशन मिळते.
2- युट्युब चॅनल सुरू करणे– सध्या युट्युब एक प्रसिद्ध असे सोशल माध्यम असून प्रसिद्ध असे व्हिडिओ वेबसाईट आहे. तुम्ही देखील youtube वर स्वतःचे चॅनल सुरू करू शकतात व त्यावर व्हिडिओ अपलोड करू शकतात. जेव्हा तुमचे चैनल youtube ची मोनेटायझेशन पॉलिसी पूर्ण करेल तेव्हा तुमच्या व्हिडिओमध्ये जाहिराती दिसू लागतात व माध्यमातून तुम्हाला चांगले उत्पन्न महिन्याला मिळत राहते.
3- ऑनलाइन कोर्सेस तयार करणे– तुम्हाला जर एखाद्या विषयाची चांगली माहिती असेल किंवा तो विषय तुम्ही इतरांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकणार असाल तर तुम्ही अशा विषयाचा एक अभ्यासक्रम तयार करून तो लॉन्च करू शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की ऑनलाईन कोर्सेस साठी फक्त एकदाच खर्च करायचा असतो
व त्यामध्ये कितीतरी विद्यार्थी शिकू शकतात. महत्त्वाचे म्हणजे अशा पद्धतीचे ऑनलाईन कोर्सेस विक्री करण्यासाठी आता खूप प्लेटफॉर्म उपलब्ध झालेले असल्याने यामुळे देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू शकतो. तसेच तुम्ही थोडीशी गुंतवणूक करून स्वतःची वेबसाईट देखील तयार करू शकतात.
4- विमा किंवा म्युच्युअल फंड विक्री– जर तुम्ही विमा एजंट किंवा विमा प्रतिनिधी तसेच म्युच्युअल फंडचे परवानाधारक विक्रेते झाले तर गुंतवणूकदारांना म्हणजेच इतर लोकांना तुम्ही विमा किंवा म्युच्युअल फंड विक्री करू शकतात. यामध्ये तुम्हाला एकदाच ग्राहकाला योजना समजावयाची असते. त्यानंतर जर विमा किंवा म्युच्युअल फंड विक्री झाला तर तो जितका वेळ चालू राहतो
तितका वेळ तुम्हाला काही ना काही कमिशन घरबसल्या मिळत राहते. आपल्याला माहित आहे की जीवन विमा पॉलिसी 20 ते 35 वर्षाच्या कालावधीचे असतात. एकदा एखाद्या ग्राहकाने विमा खरेदी केला तर त्या ग्राहकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुम्ही काहीही न करता उत्पन्न येत राहते.
5- फोटोग्राफी करून फोटोंची विक्री करणे– तुम्हाला जर चांगल्या दर्जाचे फोटो काढण्याची कला अवगत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फोटो काढून इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काढलेले दर्जेदार फोटो अपलोड करू शकतात. या प्रकारात जगभरातील ग्राहक त्या वेबसाईटवरून तुमचे फोटो पाहू शकतात व त्याचे पैसे भरून डाऊनलोड करू शकतात.
संबंधित वेबसाईट त्यांचे कमिशन ठेवून घेते व उरलेली रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करत असते.यामध्ये देखील एकदा तुम्ही फोटो काढून अपलोड केला तर तो फोटो तितक्या वेळेस डाउनलोड केला जाईल तितक्या वेळेस तुम्हाला पैसे मिळत राहतील.