Paytm Ban : आरबीआयने बुधवारी पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर अनेक निर्बंध लादले आहेत. सेंट्रल बँकेने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. पेटीएम पेमेंट बँकेने महत्वाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचं RBI कडून सांगण्यात आलं आहे.
मार्च 2022 मध्ये, केंद्रीय बँकेने PPBL ला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती. तथापि, पेटीएमने या गोष्टींचे पालन करत नसल्याचे तपासणीत आढळल्यानंतर सेंट्रल बँकेने पीपीबीएलवर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत.
बुधवारी, RBI ने PPBL च्या सर्व नवीन ठेव आणि क्रेडिट व्यवहारांवर बंदी घातली आहे. कोणत्याही पेटीएम पेमेंट ग्राहकाच्या खात्यात कोणतेही क्रेडिट किंवा डेबिट व्यवहार होणार नाहीत, असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल?
आरबीआयच्या या गाईडलाईननंतर अनेक यूजर्सना त्यांच्या पेटीएम खात्याचे काय होणार याची चिंता सतावत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुमचे खाते पेटीएम बँकेत असेल, तर ही तुमच्यासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. पण, आरबीआयने आदेश दिले आहेत की ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय पेटीएम बँकेतून त्यांचे पैसे काढू शकतात.
याशिवाय, तुम्ही पेटीएमवरून फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाही. तुम्ही 31 जानेवारीपर्यंत तुमचे KYC अपडेट केले नसले तरी तुम्ही Paytm FasTAG वापरू शकणार नाही.
पेटीएम बँकेकडून कोणतेही ईएमआय किंवा स्टेटमेंट प्रलंबित असल्यास, तुम्ही ते लवकर क्लिअर केले तर बरे होईल.
तुम्ही पेटीएम बँक खात्यात कोणताही व्यवहार करू शकणार नाही.
तुम्ही कोणतेही टॉप-अप करू शकणार नाही, ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकणार आहात किंवा तुम्ही पेटीएम वॉलेट रिचार्ज करू शकणार नाही.
ते UPI पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. मात्र, यासाठी तुमचे खाते पेटीएम बँकेत नसून दुसऱ्या बँकेत असावे.
29 फेब्रुवारीपर्यंत संधी
29 फेब्रुवारीनंतर नवीन निर्बंध लागू होतील. त्यानंतर, कोणत्याही पेटीएम ग्राहकाचे खाते, वॉलेट, प्रीपेड उपकरणे, वॉलेट, फास्टॅग्स, एनसीएमसी कार्डमध्ये कोणतीही ठेव किंवा क्रेडिट व्यवहार शक्य होणार नाहीत. तथापि, ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक संपेपर्यंत सर्व सुविधा वापरण्यास सक्षम असतील.
29 फेब्रुवारी 2024 नंतर, पेटीएम वापरकर्त्यांना UPI आणि BBPOU सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत. मध्यवर्ती बँकेने PPBL ला १५ मार्च २०२४ पर्यंत वेळ दिला आहे. या कालावधीत, सर्व पाइपलाइन व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.