आर्थिक

LIC Policy : आयुष्यभरासाठी पेन्शनची सोय! एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कपंनी आहे. LIC कडे सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध आहेत. अगदी 60 वर्षांनंतरच्या पेन्शनशी संबंधित देखील अनेक योजना आहेत. पण जर वयाच्या 40 नंतरच पेन्शन मिळू लागली तर? होय आज आम्ही LIC च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

या योजनेचे नाव LIC ची सरल पेन्शन योजना असे आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. LIC ची सरल पेन्शन योजना ही एक वार्षिक योजना आहे. ही पॉलिसी घेतल्यानंतर लगेच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. या योजनेअंतर्गत पॉलिसी खरेदी करताना, तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे जर पॉलिसीधारक काही कारणांनी मरण पावला तर त्याची जमा रक्कम नॉमिनीला परत केली जाते. या योजनेसाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. तुम्ही ही योजना एकल किंवा संयुक्त खरेदी करू शकता. पॉलिसीधारक पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकतो.

सरल पेन्शन योजनेचा लाभ दोन प्रकारे मिळू शकतो. एकल खाते आणि संयुक्त खाते आहे. एकल खात्यात जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शनचे फायदे मिळत राहतील. मृत्यूनंतर गुंतवणुकीचे पैसे नॉमिनीला परत केले जातील.

तर संयुक्त खात्यात पती-पत्नी दोघांचाही समावेश होतो. यामध्ये पॉलिसीधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन दिली जाते. मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनचा लाभ मिळतो. दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पेन्शन मिळते.

सरल पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्ही किमान मासिक पेन्शन 1000 घेऊ शकता आणि कमाल पेन्शनवर कोणतीही मर्यादा नाही. हे पेन्शन तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असते. पेन्शनसाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय मिळतो. 42 वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीने 30 लाख रुपयांची ॲन्युइटी खरेदी केल्यास, त्याला दरमहा 12388 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

Ahmednagarlive24 Office