Pension Plan : निवृत्तीनंतर पैशांची चिंता सोडा; IDBIच्या ‘या’ दोन योजना आहेत खूपच खास, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension Plan : जर तुम्ही तुच्यासाठी सध्या निवृत्ती योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा दोन योजना सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी आरामात जगू शकाल. आम्ही आज ज्या योजनांबद्दल सांगणार आहोत त्या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. चला तर मग या योजनांबद्दल जाणून घेऊया….

जर तुम्ही सध्या प्रायव्हेट कंपनीत नोकरीला असाल आणि तुम्ही आगाऊ तयारी केली नाही तर तुम्हाला निवृत्तीनंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: ज्यांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता येत नाही. मध्यमवर्गीय व्यक्ती कौटुंबिक पगारावर अवलंबून असते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण केल्यानंतर जे शिल्लक राहते तेवढेच पैसे तो वाचवू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना एकरकमी गुंतवणूक करणे कठीण होऊ शकते.

पण बाजारात वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, दीर्घ कालावधीत थोडी-थोडी गुंतवणूक करून, निवृत्तीपर्यंत एक चांगला फंड तयार केला जाऊ शकतो. तसेच नियमित पेन्शनचा लाभ घेता येईल. आयडीबीआय फेडरल देखील अशा काही योजना चालवत आहे. ही सेवानिवृत्ती योजना गुंतवणूकदारांना दीर्घकाळ बचत करण्याचा पर्याय देते. जेणेकरून वृद्धापकाळात पॉलिसीधारक त्याच्या गरजा पूर्ण करू शकेल आणि आपले जीवन आरामात जगू शकेल.

स्मार्ट ग्रोथ प्लान

40 ते 80 वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. त्याची खरेदी किंमत किमान 1,50,000 रुपये आहे. तुम्ही वार्षिकी पेआउटचा पर्याय निवडू शकता म्हणजे मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक. 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 12000 रुपये आणि मासिक 1000 रुपये पेन्शनचा लाभ मिळतो. पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते.

गॅरंटीड आजीवन उत्पन्न योजना

या योजनेअंतर्गत आयुष्यभर उत्पन्नाची हमी दिली जाते. 45 ते 85 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते. पॉलिसीची खरेदी किंमत किमान रु. 1.5 लाख आहे आणि कमाल मर्यादा नाही. पेन्शनची रक्कम गुंतवणुकीवर अवलंबून असते. तुम्हाला किमान मासिक 1000 रुपये पेन्शन मिळू शकते.