Pension Scheme : खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता सतावत असते. कारण त्यांना सरकारी नोकरदार वर्गासारखी पेन्शन मिळत नाही. अशा स्थितीत त्यांना त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन योजनेत गुंतवणक करणे फार महत्वाचे ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळवू शकता.
जर तुम्ही असंघटित क्षेत्रात असाल जिथे तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही दरमहा फक्त 210 रुपये जमा करून, निवृत्तीनंतर म्हणजेच 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये कमाल पेन्शन मिळू शकाल. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, ती योजना म्हणजे सरकारची अटल पेन्शन योजना. ज्यामध्ये दरमहा हमी पेन्शन दिली जाते.
यामध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक क्षमता आणि तुम्हाला निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन याच्या आधारे गुंतवणूक करू शकता. सरकारकडून ही योजना असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना लक्षात घेऊन सुरु करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही केवळ एक कप चहाची किंमत वाचवून दरमहा 5,000 रुपये मिळू शकतात.
अटल पेन्शन योजनेत तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी पासून गुंतवणूक सुरु करू शकता. तुम्ही यात रोज ७ रुपये वाचवून मासिक गुंतवणूक सुरु करू शकता. या योजनेत तुम्हाला निवृत्तीनंतर ५००० रुपये मासिक पेन्शन मिळते.
तुम्ही सध्या 18 वर्षांचे असल्यास, तुम्हाला हवे असल्यास, या योजनेत दररोज फक्त 7 रुपये गुंतवून, निवृत्तीनंतर म्हणजेच तुम्ही 60 वर्षे पूर्ण केल्यावर, तुम्हाला 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. ही गणना अटल पेन्शन योजनेअंतर्गत प्रीमियम चार्टवरून ओळखली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही रोज 7 रुपये वाचवाल तेव्हा महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे 210 रुपये असतील. म्हणजे तुम्ही दरमहा फक्त 210 रुपये गुंतवून ५००० रुपयापर्यंत पेन्शन मिळवू शकता.
वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्तीनंतर 5000 रुपये मासिक पेन्शन मिळविण्यासाठी तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमहा फक्त 210 रुपये योगदान द्यावे लागेल. पण तुम्ही गुंतवलेली रक्कम तुमच्या वयानुसार बदलेल. जर तुमचे वय 30 वर्षे असेल तर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 30 वर्षांसाठी दरमहा 577 रुपये गुंतवावे लागतील.