Personal Loan EMI:- आपत्कालीन आर्थिक गरज अचानकपणे उद्भवल्या नंतर बरेच व्यक्ती हे कर्जाचा आधार घेतात. अशा गरजांमध्ये एखाद्या वेळेस हॉस्पिटलचा खर्च किंवा लग्न समारंभ, परदेशवारी हे व इतर अनेक गोष्टींकरिता आपल्याला पैसा आवश्यक असतो व तितका पैसा आपल्याजवळ असतोच असे नाही.
त्यामुळे बरेच व्यक्ती पर्सनल लोनचा आधार घेतात. आपल्याला माहित आहे की विविध बँकांच्या माध्यमातून आपल्याला पर्सनल लोन दिले जाते व वेगवेगळ्या बँकांचा व्याजदर देखील वेगवेगळा असतो.
त्यामुळे या व्याजदराचा प्रभाव हा आपल्या मासिक ईएमआय वर होत असतो. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण पर्सनल लोन वर कोणत्या बँकेचा किती व्याजदर आहे व पाच वर्षाच्या कालावधी करिता जर एक लाख रुपये लोन घेतले तर किती ईएमआय तुम्हाला भरावा लागू शकतो? याबद्दलची माहिती घेऊ.
पर्सनल लोनमध्ये कोणती बँक किती आकारते व्याजदर?
1- आयसीआयसीआय बँक– आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या कालावधी करिता जर एक लाख रुपये कर्ज घेतले तर त्यावर 10.75% ते 19 टक्क्यांपर्यंत व्याजदर असू शकतात.
म्हणजेच या रकमे करता तुम्हाला दर महिन्याला 2162 ते 2594 पर्यंतचा ईएमआय भरणे गरजेचे असते. एवढेच नाही तर आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून या कर्जावर अडीच टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फीस आकारली जाते.
2- युनियन बँक ऑफ इंडिया– युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जर पाच वर्षाच्या कालावधी करीता आहे.एक लाख रुपये कर्ज घेतले तर त्यावर 9.3% पासून तर 13.4% पर्यंत व्याजदर आकारला जातो
व घेतलेल्या या एक लाख रुपये कर्जासाठी तुम्हाला प्रति महिन्याला 2090 पासून तर 2296 रुपये पर्यंतचा ईएमआय भरावा लागतो. इतक्याच नाहीतर बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेच्या 0.5 टक्के प्रक्रिया शुल्क आकारते.
3- एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँक पाच वर्षाच्या कालावधी करीता एक लाख रुपयांचे कर्ज देते व यावर 10.35 टक्क्यांपासून ते 21 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारते. याकरिता तुम्हाला 2142 ते 2705 प्रति महिन्याला ईएमआय भरावा लागतो.
4- ॲक्सिस बँक– ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता एक लाख रुपये पर्सनल लोन घेतले तर त्याचा व्याजदर 10.49 टक्क्यांपासून ते 13.65% पर्यंत आहे. यासाठी तुम्हाला 2149 ते 2309 रुपये ईएमआय भरावा लागतो.
5- बँक ऑफ इंडिया– बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पाच वर्षाकरिता तुम्ही एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर त्यावर तुम्हाला 10.35 टक्क्यांपासून ते 14.85% पर्यंत व्याजदर आकारला जातो. यामध्ये तुम्हाला 2142 ते 2371 रुपये इतका ईएमआय भरावा लागतो व बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेवर दोन टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाते.
( तुमच्या क्रेडिट स्कोरचा देखील प्रभाव हा व्याजदरावर होत असतो. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये बँकांकडून पर्सनल लोन मिळू शकते.)