आर्थिक

Personal Loan: पर्सनल लोन अवश्य घ्या, परंतु ‘या’ तीन कामांसाठी नाही! नाहीतर कर्जाच्या जाळ्यात अडकलेच म्हणून समजा

Published by
Ajay Patil

Personal Loan:- जीवन हे प्रत्येक बाबतीत अनिश्चित असते. आपल्याला माहित आहे की जीवनामध्ये पुढचा सेकंद किंवा पुढचा मिनिट नेमका कसा येईल व त्यामध्ये काय होईल? याबाबत कोणालाच कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही. अशा पद्धतीने जीवनात अनेक प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती केव्हा उद्भवतील याचा देखील आपल्याला कुठल्याही पद्धतीचा विश्वास किंवा भरवसा असत नाही.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये कित्येकदा स्वतःचा किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत वैद्यकीय समस्या उद्भवून लाखो रुपयांमध्ये आपल्याला हॉस्पिटलचा खर्च करण्याची वेळ येते किंवा घरामध्ये लग्नकार्य इत्यादी कार्यक्रम जर करायचे ठरवले तरी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. या अशा प्रकारच्या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मात्र बऱ्याचदा पैशांच्या बाबतीत अडचण निर्माण होते व साहजिकच व्यक्ती कर्जाचा पर्याय निवडतो.

आता बँकांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारची कर्जे सहजपणे दिली जातात. यामध्ये जर आपण वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनच्या दृष्टिकोनातून बघितले तर हे एक आपत्कालीन कर्ज म्हणून देखील ओळखले जाते. कारण पैशांच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहजपणे हे कर्ज उपलब्ध होत असते व याकरिता कागदपत्रे देखील जास्त लागत नाहीत.

परंतु या कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला पैसा हा तुम्ही तुमची आपत्कालीन गरज भागवण्यासाठी वापरू शकतात. परंतु या व्यतिरिक्त काही वेगळ्या कामांसाठी देखील बऱ्याच व्यक्ती पर्सनल लोन घेतात अशा पद्धतीने घेतलेले पर्सनल लोन मात्र तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते व आर्थिक  संकटात देखील तुम्ही सापडू शकतात. त्यामुळे लेखामध्ये आपण अशी तीन कारणे बघणार आहोत की त्याकरिता तुम्ही कधीही पर्सनल लोन घेणे चुकीचे ठरू शकते.

 या तीन कारणांसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन

1- उधार किंवा उसनवारीचे पैसे देण्यासाठी बऱ्याचदा काही निमित्ताने कोणाकडून उधार किंवा उसने पैसे घेतलेले असतात हे घेतलेले पैसे आपल्याला परत करायचे असतात. त्यामुळे बरेच व्यक्ती असे उसनवार घेतलेले पैसे परत करण्यासाठी पर्सनल लोन घेतात.

परंतु ही चूक कधीच करू नये. या मार्गाने तुम्ही तुमची उधारी नक्कीच परतफेड करू शकतात. परंतु तुम्ही दुसऱ्या बाजूने वैयक्तिक कर्जाच्या चक्रामध्ये अडकतात व अनेक वर्ष त्याचे हप्ते भरत राहतात. जर तुमची या पद्धतीचे कर्ज फेडण्याची क्षमता नसेल तर तुम्ही स्वतःसाठी खड्डा खोदत आहात हे समजावे. त्यामुळे पुढे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

2- शेअर बाजारातील गुंतवणूक जे व्यक्ती शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करतात ते व्यक्ती अशा प्रकारची चूक फार मोठ्या प्रमाणावर करतात. शेअर मार्केट मधून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याकरिता पर्सनल लोन घेतले जाते व ते घेतलेले पैसे शेअर बाजारामध्ये गुंतवले जातात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेअर बाजार हा अनिश्चित व जोखमीचा असतो.

बरेच जण अति आत्मविश्वासाने या पद्धतीचे पाऊल उचलतात व स्वतःसाठीच मोठी समस्या निर्माण करून घेतात. जर तुम्ही पर्सनल लोन घेऊन मिळवलेला पैसा जर शेअर बाजारात गुंतवला व त्यामध्ये जर नुकसान झाले तर तुम्ही पर्सनल लोन आयुष्यभर फेडत राहतात व नाहक कर्जात अडकतात.

3- हौस पूर्ण करण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना सोन्याची दागिने किंवा अंगठी घ्यायची इच्छा असते किंवा एखादा महागडा मोबाईल तरी घ्यायचा असतो व अशा पद्धतीची हौस पूर्ण करण्यासाठी बऱ्याच व्यक्तींना पर्सनल लोन घेण्याची सवय असते व अशा प्रकारची हौस असे लोन घेऊन पूर्ण केली जाते.

परंतु यासारख्या गोष्टींमुळे आपण कर्जाच्या जाळ्यात अडकतो व कर्जाचे हप्ते फेडत राहतो. यामुळे बऱ्याचदा आपले आर्थिक बजेट देखील विस्कळू शकते. त्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याच्या नादात अशा प्रकारचे पर्सनल लोन घेण्याची चूक अजिबात करू नये.

त्यामुळे एकंदरीत पाहिले तर पर्सनल लोन हे जरी तारणमुक्त कर्ज असले तरी देखील सोयीमुळे पर्सनल लोन घेणे चुकीचे ठरते. तसेच पर्सनल लोनचा व्याजदर देखील तुलनेने खूप जास्त असल्याने शक्य असेल तर पर्सनल लोन घ्यायचे टाळण्याचे फायद्याचे ठरते. परंतु जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरच अशा प्रकारची कर्ज घेणे महत्वाचे ठरते असे देखील तज्ञांकडून सल्ला दिला जातो.

Ajay Patil