Personal Loan EMI Calculator:- प्रत्येकाला जीवनामध्ये अचानकपणे काही परिस्थितीत पैशांची गरज भासते. ती गरज वैद्यकीय खर्चाच्या संबंधित असू शकते किंवा लग्नकार्य, मुलांचे शिक्षण किंवा पर्यटनासारख्या बाबीवर देखील खर्च करण्याची गरज भासते व तेव्हा मात्र आपल्याकडे आवश्यक असेल इतका पैसा असतो असे होत नाही.
त्यामुळे आर्थिक निकड भागवण्यासाठी व्यक्ती साहजिकच कर्जाचा पर्याय अवलंबतो. यासाठी मित्र किंवा नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतले जातात किंवा बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनकरिता अर्ज केला जातो.
परंतु जर पर्सनल लोनच्या बाबतीत बघितले तर हे लोन घेण्यापूर्वी आपल्याला बँकांच्या काही अटी असतात त्या पूर्ण करणे गरजेचे असतात व तेव्हाच आपल्याला कुठे पर्सनल लोन मिळत असते.
यामध्ये सगळ्यात प्रमुख अट असते ती म्हणजे पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती आहे? या गोष्टीला यामध्ये खूप महत्त्व असते. त्यासंबंधीची माहिती थोडक्यात बघू.
पर्सनल लोन घेण्यासाठी दरमहा किती पगार असावा?
तुम्हाला जर पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा असेल तर त्याआधी अर्जदारांसाठी त्याच्या पगाराचा निकष खूप महत्त्वाचा असतो व असे निकष वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात.
साधारणपणे बघितले तर 15 ते 25 हजार रुपये महिन्याला पगार असलेल्या व्यक्तीला वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन मिळणे शक्य होते. परंतु यामध्ये तुम्हाला नेमके किती कर्ज द्यायचे हे तुमचे उत्पन्न किती आहे याचा आधार घेऊन बँक ठरवत असते.
पर्सनल लोनचा वापर कशासाठी करता येतो व परतफेडीचा कालावधी किती असतो?
पर्सनल लोन घेऊन व्यक्तीला लग्नकार्य तसेच उच्चशिक्षण, घराचे नूतनीकरण किंवा प्रवास किंवा त्याच्या घरगुती आर्थिक गरजा भागवता येतात व तुम्ही जर पर्सनल लोन परतफेडीचा कालावधी पाहिला
तर बऱ्याच बँका याकरिता 12 ते 60 महिन्याचा कालावधी देतात व त्यामध्ये आपण आपला बजेट आणि आपली सोय बघून कालावधीची निवड करू शकतात.
पर्सनल लोनसाठी किती व्याजदर असतो?
यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर हे वेगवेगळे आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून जर पर्सनल लोन घेतले तर त्याकरिता 10.45 टक्क्यांपासून ते 24 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जाऊ शकतो.
या व्यतिरिक्त तुम्हाला जीएसटी आणि त्यासोबतच प्रक्रिया शुल्क देखील द्यावे लागते. अशा पद्धतीने प्रत्येक बँकांचे प्रक्रिया शुल्क तसेच व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात.
कुठली कागदपत्रे लागतात?
तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता राहत नाही. याकरिता ओळखपत्र तसेच पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा इत्यादीची आवश्यकता तुम्हाला भासते.