Personal Loan : स्वस्त व्याजदरावर पर्सनल लोन हवंय?; पहा ‘या’ बँकांचे व्याजदर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan : जर तुम्हाला सध्या पैशांची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. सध्या देशातील अनेक बँक वैयक्तिक कर्जावर कमी दारात कर्ज देत आहेत. इतर कर्जाच्या मानाने वैयक्तिक कर्ज खूप महाग असते, पण या बँका तुम्हाला स्वस्त दरात कर्ज ऑफर करत आहेत.

आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत जे शून्य प्रक्रिया शुल्कासह वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहेत. ज्या ग्राहकांचे क्रेडिट स्कोअर चांगले आहेत बँका त्यांना अत्यंत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देते. आज या लेखात आपण अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत.

यामध्ये सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदर देत आहे. यामध्ये लोकांना 84 दिवसांचा कार्यकाळ दिला जात आहे.

यानंतर पंजाब अँड सिंध बँक 3 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 12.80 टक्के दराने व्याज देत आहे. हे बँक कर्ज 60 महिन्यांपर्यंत दिले जाते.

तर बँक ऑफ इंडियाबद्दल 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज आकारत आहे. या प्रकरणात, या कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

यानंतर, इंडसइंड बँक 30 हजार किंवा त्याहून अधिक आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जासाठी 10.25 टक्के ते 32.02 टक्के व्याज आकारत आहे. या कर्जाची मुदत 12 ​​ते 60 महिन्यांपर्यंत आहे.

वैयक्तिक कर्जाच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफ बडोदा 10.35 टक्के ते 17.50 टक्के व्याजदरावर 50 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहे. या बँकेचा कर्जाचा कालावधी 48 ते 60 महिन्यांचा आहे.