Petrol Diesel Price : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेले युद्ध संपण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही उतरण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $113 च्या जवळ पोहोचल्या आहेत.
देशभरात (Country) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी नवीन किमती जाहीर केल्या आहेत. आजही देशातील अनेक शहरांमध्ये (City) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहे.
काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी तेलाच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे.
देशभरात 125 दिवस तेलाच्या किमती स्थिर होत्या, त्यानंतर त्या बदलण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशसह एकूण 5 राज्यांतील निवडणुका (Election) संपल्यानंतर तेलाच्या किमती कमी जास्त होत आहेत.
निवडणुका संपल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगाने वाढ होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले, मात्र असे काहीही आतापर्यंत दिसून येत नाही.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात केली जात आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींनी जगभरात खळबळ उडाली आहे.
आज आर्थिक राजधानी मुंबई शहरात पेट्रोल 109.96 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.13 रुपये प्रति लिटर आहे. तसेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 95.45 तर डिझेल 86.71 रुपये, कोलकाता शहरात पेट्रोल 104.65 रुपये आणि डिझेल 89.78 रुपये तसचे चेन्नई शहरात पेट्रोल 101.38 रुपये तर डिझेल 91.42 रुपये, हैदराबादमध्ये पेट्रोल 108.18 रुपये तर डिझेल 94.61 रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल 100.56 रुपये तर डिझेल 85 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.
oilprice.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $112.7 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमती $108.3 प्रति बॅरल होत्या. म्हणजेच अवघ्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत 4.40 डॉलरची वाढ झाली आहे.
आज म्हणजेच 12 मार्च रोजी डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत 3.12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीसह, WTI क्रूडची किंमत 11 मार्च रोजी $105.6 वरून $109.3 पर्यंत वाढली आहे. याशिवाय ब्रेंट क्रूडच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे. आज ब्रेंट क्रूडची किंमत 3.05 टक्क्यांनी वाढून $112.7 वर पोहोचली आहे.