Petrol Price Today : रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्चा तेलाच्या किमती कमी जास्त होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर (Rate) होत आहे. मात्र युद्धाचा परिणाम पाहता पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ३ आठवडे विक्रमी पातळीवर राहिलेल्या रशिया-युक्रेन तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आल्या आहेत. त्यामुळे आज पुन्हा दरवाढ झाली आहे.
आज पुन्हा एकदा या दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात.
या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर 112.51 रुपये आणि डिझेलचा दर 96.70 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 107.18 रुपये तर डिझेलचा दर 92.22 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 103.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटर आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली : 89.07 97.81
मुंबई : 96.70 112.51
कोलकाता : 92.22 107.18
चेन्नई : 93.71 103.67
खरे तर रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.