आर्थिक

नोकरदारांचे टेन्शन झाले कमी! आता तुम्ही नोकरी बदलली तर तुमचे पीएफ खाते सहज करता येईल ट्रान्सफर; कसे ते वाचा?

Published by
Ratnakar Ashok Patil

PF Account Transfer:- कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून आणि प्रकारच्या सोयी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्याकरिता बऱ्याच नियमांमध्ये या संघटनेच्या माध्यमातून मोठे बदल करण्यात आले आहेत.

त्यातील जर एक महत्त्वाचा बदल बघितला तर तो म्हणजे पीएफ निधी ट्रान्सफर करण्याचा जो काही नियम आहे त्यामध्ये करण्यात आलेला बदल होय. आपल्याला माहित आहे की, जेव्हा एखादा कर्मचारी त्याची नोकरी बदलतो तेव्हा त्याचे पीएफ खाते देखील ट्रान्सफर होते व ते करावे लागते.

अशा प्रकारे पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची जी प्रक्रिया होती ती अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती. परंतु 15 जानेवारी 2025 च्या निर्देशानुसार, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ खाते काही विशेष प्रकरणांमध्ये ऑनलाइन स्वरूपात हस्तांतरित करता येणार आहे.

विशेष म्हणजे या पीएफ खाते ट्रान्सफरसाठी जुन्या किंवा नवीन कंपनीच्या कुठल्याही मंजुरीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे आता हा बदल केल्याने ऑनलाईन हस्तांतरणाचा दावा नेहमीपेक्षा खूप सोपा आणि कमी वेळेत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे कायम नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता आधार आणि इतर आवश्यक कागदपत्रांची मदत भासणार आहे व या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

कर्मचाऱ्यांना आता ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून नाव, जन्मतारीख, जोडीदाराचे नाव, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, लिंग आणि नोकरीची तारीख यासारखी वैयक्तिक माहिती मधील चुका देखील दुरुस्त करता येणार आहेत.

पीएफ हस्तांतरण करण्यासाठी काय आहे आवश्यक पात्रता? कोणत्या अटी कराव्या लागतील पूर्ण?

1- युएएन नंबर आधारशी लिंक करणे गरजेचे- आपल्याला माहित आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याचा एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात युएएन क्रमांक असतो व तो आधारशी जोडलेला आणि व्हेरिफाय असणे गरजेचे आहे.

2- केवायसी- आधार आणि पॅन कार्ड व बँक खाते यासारखी तुमच्या खात्यांची माहिती ईपीएफओ प्रणालीमध्ये सत्यपीठ म्हणजेच व्हेरिफाईड असणे आवश्यक आहे.

3- बाहेर पडण्याची तारीख- तुमच्या पूर्वीचा नियोक्ता म्हणजेच कंपनीच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या जुन्या कंपनीतील शेवटच्या नोकरीची तारीख ईपीएफओ पोर्टल वर अपडेट केली जाणे गरजेचे आहे.

4- ईपीएफओ खाते-तुमचे जुने पीएफ खाते आणि नवीन पीएफ खाते हे दोन्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओद्वारे व्यवस्थापित केले जाणे गरजेचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने कसे कराल पीएफ खाते ट्रान्सफर?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला ईपीएफओ सदस्य पोर्टलवर जावे लागेल.

2- त्यानंतर तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून खात्यामध्ये लॉगिन करावे.

3- यानंतर ऑनलाईन सेवा टॅब वर जा आणि एक सदस्य- एक ईपीएफ खाते( हस्तांतरण विनंती) या पर्यायावर क्लिक करा.

4- त्यानंतर वैयक्तिक तपशील व त्यासोबत विद्यमान म्हणजेच तुमच्या चालू पीएफ खात्याशी संबंधित तपशील त्या ठिकाणी नमूद करा.

5- अशाप्रकारे पीएफ खात्याच्या तपशिलांची पडताळणी केल्यानंतर अंतिम पीएफ खाते तपशील या पर्यायावर क्लिक करा.

6- तुमच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी तुमचा पूर्वीचा नियोक्ता म्हणजे अगोदरची कंपनी आणि नवीन कंपनी मिळवा.

7- यानंतर युएएन वर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपीसाठी सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

8- ओटीपी टाकल्यानंतर सबमिट ट्रान्सफर रिक्वेस्ट वर क्लिक करा.

9- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही ट्रॅक क्लेम स्टेटस वर जाऊन तुमच्या हस्तांतरण विनंतीच्या स्थितीचे म्हणजे स्टेटस पाहू शकाल.

10- या सगळ्या प्रक्रियेनंतर तुमची कंपनी युनिफाईड पोर्टलच्या नियोक्ता इंटरफेसद्वारे तुमची ईपीएफ हस्तांतरण विनंती मंजूर करेल.

Ratnakar Ashok Patil