PF Withdraw Money : पीएफ खात्यातून ‘हे’ खातेदार लग्नासाठी काढू शकतात जास्त पैसे, जाणून घ्या पैसे काढण्याची मर्यादा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PF Withdraw Money : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ही एक सरकारद्वारे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. या योजनेमधून कर्मचाऱ्यांना अनेक फायदे दिले जात आहेत. तसेच कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर या योजनेत जमा केलेले पैसे काढू शकतात.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक टक्के रक्कम पीएफ फंडामध्ये जमा केली जाते. सरकारकडून कर्मचाऱ्यांना पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज दिले जाते.

या व्याजदरात सरकारकडून दरवर्षी बदल केला जात आहे. सध्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी पीएफमधील शिल्लक रकमेवर सरकारकडून ८.१५ टक्के व्याज दर देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

EPFO च्या नियमानुसार पीएफमधील पैसे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर काढू शकतात. मात्र काही अटी आणि नियमानुसार कर्मचारी कधीही सहज आणि सोप्या पद्धतीने पीएफमधील पैसे काढू शकतात. EPFO कडून पीएफ मधील पैसे काढण्यासाठी काही नियम बनवले आहेत.

किती पैसे काढता येतील?

EPFO च्या नियमानुसार खातेधारक लग्नासाठी FIF फंडातून जास्त पैसे काढू शकतो. तसेच मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी खातेधारकाला अधिक रक्कम काढण्याची मुभा EPFO कडून दिली जाते.

स्वतःच्या किंवा मुलांच्याच नाही तर खातेधारक भावाच्या आणि बहिणीच्या लग्नासाठी देखील पैसे काढू शकतात. मात्र पीएफ खातेधारकाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर जमा केलेल्या रकमेतील ५० टक्के रक्कम ते व्याजासह काढू शकतात. मात्र ज्या खातेधारकाला असे पैसे काढायचे आहेत त्या खातेधारकाचे खाते ७ वर्षांपेक्षा जुने असावे लागते.

पैसे काढण्याची मर्यादा

जर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर तुम्ही पीएफ खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम व्याजासह काढू शकता. यासाठी तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला हे पैसे ७२ तासांत मिळून जातील. तसेच तुमचे पीएफ खाते आधार कार्डशी लिंक केलेले असले तरच तुम्ही ऑनलाईन पैसे काढू शकता.

EPFO पोर्टलवरून शिल्लक तपासा

जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पृष्ठावर, UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर, पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा.
आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, जे डाउनलोड केले जाऊ शकते.
तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.