अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- सन २०१९-२० या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर जाहीर केलेल्या व्याजाचा मोबदला पीएफ सभासदांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
आता आपली काळजी मिटणार आहे कारण पीएफ खात्यावर जमा झालेले व्याज घर बसल्या आता आपल्याला कळणार आहे. त्यामुळे आता आपल्या खात्यावर याज जमा झाले की नाही हे घरबसल्या कळणार आहे.
२०१९-२० वर्षाचा पीएफ सभासदांच्या खात्यावर जमा केला जात आहे. तो पीएफ थोडा थोडका नव्हे तर ८.५ टक्के दराने मिळणार आहे.या प्रस्तावाला अर्थ खात्याने मंजुरी दिली आहे.
व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात पण केली गेली आहे. या योजनेमुळे खातेदारांना दरवेळी बँकेत जाण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने ८.५ टक्के व्याजाची रक्कम सभासदांना देण्यात यावी अशी मागणी सरकाकडे केली होती. त्यावर अर्थ खात्याने मंजुरी दिली आहे.
आता खातेदारांना संपूर्ण ८.५ टक्के व्याजाची रक्कम पीएफ सभासदांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आपल्या खात्यात पीएफ जमा झाला कि नाही याची चौकशी पण घरबसल्या करता येणार आहे.
यात Umang App या सरकारी अँपमधून पीएफ व्याजबाबत ही माहिती मिळणार आहे. स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन ही माहिती मिळवता येणार आहे.
त्यानंतर SMS च्या माध्यमातून पण पीएफ किती शिल्लक आहे याची माहिती मिळणार आहे. एका मिस्ड कॉलद्वारे पण व्याजाबद्दल माहिती मिळणार आहे.त्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा या वेबसाईटवर या बद्दल माहिती मिळेल.