PM Kisan Yojana : लवकरच खात्यात येणार 15 व्या हप्त्याचे पैसे, त्यापूर्वी करा ही कामे; नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना शेती करत असताना पूर, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकार त्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान योजना होय.

सरकारच्या या योजनेचा कोट्यवधी लोक फायदा घेत आहेत. नुकताच या योजनेचा 14 वा हप्ता खात्यात जमा करण्यात आला. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 15 व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. त्यापूर्वी काही महत्त्वाची कामे करून घ्या नाहीतर, तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्यानंतर केंद्र सरकार आता 15वा हप्ता देण्याच्या तयारीत आहे. 15 व्या हप्त्यासाठी नवीन नोंदणी सुरू झाली असून आता तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास, तर तुम्ही पीएम किसान pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नाव नोंदणी करू शकता. तसेच तुम्ही तुमचे स्टेटसही पाहू शकता. आता तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन PM किसान योजनेसाठी नोंदणी करून घ्या.

हे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांची अगोदरच नोंदणी झाली आहे आणि ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला 15 व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

  • सर्वात अगोदर पीएम किसान http://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.
  • तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

या योजनेंतर्गत सरकार अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये देत आहे. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे चार महिन्यांच्या अंतराने 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांत ट्रान्सफर केले जातात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. यापूर्वी, 27 जुलै 2023 रोजी, 14 व्या हप्त्यांतर्गत, केंद्राने देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली होती.