PM Mudra Yojana: मोठी बातमी ! व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपये ; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Mudra Yojana: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

या घोषणेनुसार केंद्र सरकार आता नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांना हमीशिवाय 10 लाखांचा कर्ज देणार आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेत तुम्ही देखील तुमच्यासाठी कमी गुंतणवुकीमध्ये नवीन व्यवसाय सुरु करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी हमीशिवाय दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. सरकारला प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे स्टार्टअप संस्कृतीला चालना द्यायची आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आतापर्यंत अनेक लोकांनी या योजने अंतर्गत लाभ घेऊन नवीन व्यवसाय सुरु केले आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक विशेष प्रकारचे मुद्रा कार्ड मिळते. हे कार्ड तुम्ही डेबिट कार्डप्रमाणे वापरू शकता मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जाणार नाही.

लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कामांसाठी दिला जातो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mudra.org.in/ ला भेट देऊन योजनेत सहजपणे अर्ज करू शकता.

हे पण वाचा :- Saturn Enter Shatabhisha Nakshatra: शनिदेवाचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश ! ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 4 राशींच्या धनात होणार प्रचंड वाढ ; वाचा सविस्तर