आर्थिक

PNB Update : पीएनबी बँकेने व्याजदरात केले मोठे बदल, ग्राहकांना होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा…

Published by
Ahmednagarlive24 Office

PNB Update : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेने नुकतेच आपले एफडी दर वाढवले आहेत, अशास्थितीत आता ग्राहकांना एफडीवर अधिक परतावा मिळणार आहे. बँक विविध कालावधीनुसार व्याजदर ऑफर करते.

जर तुम्ही देखील सध्या कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पंजाब बँकेची एफडी तुम्हाला फायदेशीर ठरेल. येथे तुम्हाला सुरक्षेसह उत्तम परतावा देखील मिळेल.

प्रत्येक बँका वेळोवेळी त्यांचे व्याजदर बदलत असतात. अशातच जाब नॅशनल बँकेनेही आपले व्याजदर बदलले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडी व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर 12 एप्रिल 2024 पासून आहेत. नवीन व्याजदरांबद्दल बोलताना, नवीन ग्राहकांना 3.50 टक्के ते 7.25 टक्के पर्यंत व्याजदराचा लाभ दिला जाईल.

त्याच वेळी, ही बँक 4 टक्के ते 7.75 टक्के पर्यंतच्या व्याजदराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना देत आहे. त्याच वेळी, या बँका सुपर ज्येष्ठ नागरिकांना 4.30 टक्के ते 8.05 टक्के पर्यंत व्याजदर देतात.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ग्राहकांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 3.5 टक्के व्याजदर मिळत आहे. 15 ते 29 दिवसांवरही 3.5 टक्के व्याजदर मिळतात. ग्राहकांना 300 दिवसांच्या कालावधीत 6.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. ग्राहकांना 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.25 टक्के व्याजदर मिळत आहे. ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.7 टक्के व्याजदर मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office