Categories: आर्थिक

पोस्टाने आजपासून सुरु केले ‘हे’ पेमेंट अ‍ॅप ; पैसे ट्रान्स्फर होण्यासोबतच मिळतील ‘हे’ फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) विभागाने आज (मंगळवारी) आपले डिजिटल पेमेंट अॅप ‘डाक-पे’ लॉन्च केले.

आयपीपीबीने एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, हे अॅप देशाच्या शेवटच्या कोपऱ्यात डिजिटल आर्थिक सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आले आहे.

या सुविधा अ‍ॅपवर उपलब्ध असतील :- निवेदनात म्हटले आहे की ते फक्त डिजिटल पेमेंट अ‍ॅपच नाही तर आयपीपीबीच्या वतीने टपाल नेटवर्कच्या माध्यमातून देशभरातील विविध सोसायट्यांना बँकिंग सेवा पुरविल्या जणाऱ्या डिजिटल सुविधा उपलब्ध होण्यास मदत करेल. या अ‍ॅपद्वारे, आपल्या प्रियजनांना पैसे पाठविणे (घरगुती मनी ट्रान्सफर) सेवा आणि व्यापाऱ्यांना डिजिटल स्वरूपात, कॅशलेस इकोसिस्टम आणि युटिलिटी बिले भरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून बायो-मेट्रिक्सद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.

लॉकडाऊन दरम्यान पोस्टाने विविध सेवा दिल्या :- डाक-पे अ‍ॅपच्या लाँचिंग दरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कोविड -19 मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान आयपीपीबीने डोरस्टेप आर्थिक सेवा दिली. याशिवाय आयपीपीबीने विविध मार्गांनी टपाल सेवा दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की डाक पे सुरू झाल्याने इंडिया पोस्टचा वारसा आणखी वाढला आहे.

बँकिंग सेवा आणि टपाल उत्पादनांवर ऑनलाईन प्रवेश असेल :- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की या अभिनव सेवेद्वारे ग्राहकांना बँकिंग सेवा आणि टपाल उत्पादनांवर ऑनलाइन प्रवेश मिळू शकेल. ऑनलाइन ऑर्डर आणि टपाल आर्थिक सेवांसाठी ही एक अनोखी संकल्पना आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आयपीपीबीचे ऑनलाइन पेमेंट आणि आर्थिक सेवांची होम डिलिव्हरी दुप्पट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आयपीपीबीची सुरुवात 2018 मध्ये झाली :- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 1 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली. आयपीपीबी देशभरात पसरलेल्या 1.55 लाख टपाल कार्यालये आणि 3 लाख टपाल कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देत आहे. ग्रामीण भागात 1.35 लाख टपाल कार्यालये आहेत. आयपीपीबी सध्या 13 भाषांमध्ये आपल्या सेवा देत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24