Post Office : पोस्ट ऑफिस कडून अनेक बचत योजना राबवल्या जातात, बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील मुदत ठेवींची परवानगी देते. पोस्ट ऑफिस ग्राहकांना एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदत ठेवी ठेवण्याची परवानगी देते. जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता, सध्या पोस्ट ऑफिस बँकापेक्षा अधिक व्याजदर ऑफर करत आहे.
इंडिया पोस्ट एका वर्षासाठी ६.९ टक्के, दोन वर्षांसाठी ७ टक्के, तीन वर्षांसाठी ७.१ टक्के आणि पाच वर्षांसाठी ७.५ टक्के व्याजदर देत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला या वेगवेगळ्या कालावधीत 1 लाख रुपये गुंतवायचे असतील तर तुम्हाला किती फायदा होईल, जाणून घेऊया
1 वर्षासाठी मुदत ठेव
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये एका वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवल्यास, 6.9 टक्के व्याजदराने, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,07,081 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला 7,081 रुपये व्याजाची रक्कम मिळेल.
2 वर्षांसाठी मुदत ठेव
जेव्हा तुम्ही दोन वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 7 टक्के व्याजदराने मॅच्युरिटीवर एकूण 1,14,888 रुपये मिळतील. या एकूण रकमेपैकी तुम्हाला 14,888 रुपये व्याज म्हणून मिळतील.
3 वर्षांसाठी मुदत ठेव
3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा FD स्कीममध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला एकूण 1,23,508 रुपये मॅच्युरिटीवर 7.1 टक्के व्याजदराने मिळतील. यामध्ये तुम्हाला रिटर्न किंवा व्याज म्हणून 23,508 रुपये मिळतील.
5 वर्षांसाठी मुदत ठेव
जर तुम्ही आज या प्रदीर्घ कालावधीच्या ठेवी योजनेत 5 वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवले, तर 7.5 टक्के व्याज दराने, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,44,995 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला 44,995 रुपये व्याज म्हणून परतावा मिळेल.