Post Office Saving Schemes : देशात अनेक बचत योजना आहेत. त्यापैकी पोस्टाच्या बचत योजना सर्वात लोकप्रिय आहेत. कारण येथील योजना सुरक्षेसह उत्तम परतावा देखील देतात. तुम्ही देखील सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्टाची अशीच एक बचत योजना सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिसद्वारे अनेक बचत योजना ऑफर केल्या जातात, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना बंपर व्याज मिळत आहे. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीमबद्दल बोलत आहोत.
या योजनेत लोकांना चांगला परतावा मिळत आहे, येथे मिळणाऱ्या परताव्यामुळे ही योजना लोकप्रिय होत आहे. जर तुम्हीही चांगल्या परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना लोकांना श्रीमंत बनवत आहे. या योजनेत तुमचे पैसे फक्त सुरक्षित राहत नाही तर तुम्ही उत्तम व्याज देखील मिळवता.
यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे. या योजनेतील व्याजदर दर तिमाहीला बदलतात. अशातच तुमच्यासाठी ही गुंतवणूक योजना एक चांगला पर्याय ठरेल.
काही दिवसांपूर्वी टाईम डिपॉझिट योजनेवरील व्याजदर ७ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्यात आला होता. या व्याजदरासह, ही पोस्ट ऑफिस योजना सर्वोत्तम बदत योजनेत समाविष्ट आहे.
इतकी होईल कमाई :-
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत लोकांचे पैसे दुप्पट होत आहेत. यामध्ये ग्राहकाने पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर त्याला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. या कालावधीत, त्याला ठेवीवरील 2,24,497 रुपयांचे व्याज मिळेल. या योजनेत एकूण गुंतवणूक 7,24,974 रुपये होईल.