आर्थिक

Post Office RD : ‘या’ ठिकाणी गुंतवा पैसे, सुरक्षेच्या हमीसह प्रत्येक महिन्याला होईल जबरदस्त कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office RD : समजा भविष्यामध्ये तुमचा एखाद्या योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. या योजनेची खासियत म्हणजे तुमचा पैसा सुरक्षीत राहातो आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या मोबदल्यात चांगला परतावा मिळतो.

परंतु सध्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये पोस्टाच्या बचत योजनांपेक्षा जास्त पैसे मिळतात. या योजनेत जोखीम जास्त असते. समजा तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता चांगला परतावा मिळावायचा असेल तर तुम्ही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये सरकार आता 6.2 टक्क्यांवरून 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही जी आरडी स्कीम सुरू करणार असाल तर त्यापूर्वी त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही आता 2,000, 3,000 किंवा 4,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळू शकते? जाणून घ्या त्याबद्दल.

3,000 रुपयांच्या RD वरील व्याज

समजा आता तुम्ही आरडी स्कीममध्ये 3,000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाला 36,000 रुपये जमा करू शकता. अशा परिस्थितीत, समजा तुम्ही 5 वर्षांची आवर्ती ठेव केल्यास तर तुमच्याकडे एकूण 1 लाख 80 हजार रुपये जमा होतील. तुम्हाला या आरडी स्कीमवर रु. 32,972 व्याज मिळतील एकंदरीतच मॅच्युरिटीवर रु. 2,12,971 परतावा मिळेल.

2,000 रुपयांच्या RD वरील व्याज

तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये गुंतवले तर 1 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 24,000 रुपये इतकी होईल. तर 5 वर्षात ते 1 लाख 20 हजार रुपये इतकी होऊ शकते. तसेच यावर 6.5 टक्के दराने व्याज मोजायचे झाले तर 5 वर्षात तुम्हाला 21,983 रुपये व्याज मिळू शकते. अशा प्रकारे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मॅच्युरिटीवर 1 लाख 41 हजार 983 रुपयांचा फायदा होईल.

मिळेल हमी

पोस्ट ऑफिस स्कीममध्ये हमीसह परतावा मिळत आहे कारण ही सरकारी योजना आहे. यात तुमचे पैसे बुडत नाही. 1 जुलैपासून आरडी योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. तर आता या योजनेवर 6.5 टक्के दराने व्याज मिळणार असून जे 5 वर्षांसाठी उपलब्ध असणार आहे. तुम्ही या योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्हाला मॅच्युरिटीवर चांगला फायदा मिळेल.

Ahmednagarlive24 Office