Post Office Saving Scheme : आपल्याला पैशांची कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. परंतु यावर उपाय म्हणून आतापासूनच गुंतवणूक आणि बचत करायला पाहिजे. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे.
अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करतात. कारण यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्त परतावा मिळतो आणि कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करून घरबसल्या पैसे कमावू शकता.
या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जास्त दूर जाण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही तुमच्या घराजवळ पोस्ट ऑफिस खाते उघडून तुम्हाला पैशांची गुंतवणूक करता येईल. देशातील सामान्य जनतेसाठी पोस्ट ऑफिसने अनेक बचत योजना आणल्या आहेत, ज्यामध्ये चांगला परतावा मिळतो.
या आहेत पोस्ट ऑफिसच्या योजना
नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिट
नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिट ही एक सर्वोत्तम बचत योजना असून या अंतर्गत गुंतवणूकदारांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के व्याज दिले जाते. तसेच यामध्ये तीन वर्षांसाठी 7, दोन वर्षांसाठी 6.9 आणि एका वर्षासाठी 6.8 टक्के दराने व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजना
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. या योजनेत ८ टक्के व्याज मिळते. या योजनेअंतर्गत मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
किसान विकास पत्र
ही शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसने सुरु केलेली उत्तम योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना ७.५ टक्के व्याज मिळते. एका अंदाजानुसार, सांगायचे झाले तर या योजनेतील गुंतवणूकदारांची ठेव रक्कम सुमारे 10 वर्षांत डबल होते.
मासिक उत्पन्न योजना
ही पोस्ट ऑफिसची खूप लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना ७.४ टक्के दराने व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत ८.२ टक्के दराने व्याज मिळते.
महिला सन्मान बचत योजना
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने सुरु केलेली ही एक शानदार बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसमध्येही त्यांचे खाते चालू करता येते. यामध्ये महिलांना ७.५ टक्के दराने व्याज देण्यात येते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
ही पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम योजनांपैकी एक योजना आहे. यात गुंतवणूकदारांना ७.७ टक्के व्याज मिळत आहे.
बचत खाते
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते चालू करता येते. यात गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर ४ टक्के दराने व्याज मिळते.
आवर्ती ठेव खाते
पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव खात्याअंतर्गत गुंतवणूक करता येते. यावर ६.२ टक्के दराने व्याज दिले जाते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते चालू करता येते. यात ठेवीदारांना जमा करण्यात आलेल्या रकमेवर ७.१ टक्के व्याज दिले जाते.