आर्थिक

Post Office Saving Schemes : यंदाच्या दिवाळी पाडव्याला बायकोला द्या ‘हे’ हटके गिफ्ट !

Published by
Sonali Shelar

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसकडे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी एकापेक्षा एक योजना आहेत, तसेच पोस्टाच्या महिलांसाठीच्या योजना देखील खूप खास आहेत. अशातच तुम्ही तुमच्या पत्नीसाठी दिवाळीच्या सणासाठी काही भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल? तर सोन्याचे दागिने, गॅझेट किंवा इतर गोहस्ती देण्याऐवजी तुम्ही तुमच्या पत्नीसाठी पोस्टाची योजना खरेदी करू शकता.

पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची पत्नी 2 वर्षात श्रीमंत होऊ शकते. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी पोस्ट ऑफिस स्कीम महिला सन्मान प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करू शकता. भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. त्यापैकी महिलांसाठी अनेक उत्कृष्ट योजना राबवत आहे. महिला या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

दिवाळीसाठी, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी पोस्ट ऑफिस स्कीम महिला सन्मान प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवू शकतात.

महिला सन्मान प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक केल्याने महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळतो. या योजनेअंतर्गत महिला 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकतात. तुम्हाला दोन वर्षांत गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजाचा निश्चित दर मिळेल. यामुळे पत्नी भविष्यात बचत करून स्वावलंबी होऊ शकेल.

कर सूट

या योजनेत जमा केलेल्या पैशांवर सरकार 80C अंतर्गत कर सूटही देत ​​आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास सर्व महिलांना करसवलत मिळेल.

2 वर्षांत मिळतील एवढे पैसे !

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, पोस्ट ऑफिस दोन वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के दराने व्याज देत आहे. उदाहरणार्थ तुम्ही एकदा 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला त्यावर पहिल्या वर्षी 15,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 16,125 रुपये नफा मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत 31,125 रुपये नफा मिळेल.

Sonali Shelar