Post Office Scheme : पोस्टाची सुपरहिट योजना! 115 महिन्यांत पैसे दुप्पट, करा या योजनेत गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या योजना सुपरहिट आणि सुरक्षित ठरू शकतात. पोस्ट ऑफिसकडून गुंतवणूकदारांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच या योजनांमधून गुंतवणूकदारांना कमी कालावधीत अधिक नफा दिला जात आहे.

तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या सुपरहिट योजनेमध्ये गुंतवणूक करून काही दिवसांमध्ये बक्कळ परतावा मिळवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही 115 महिन्यांमध्ये दुप्पट परतावा मिळवू शकता.

किसान विकास पत्र या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून सात टक्क्यांहून अधिक व्याजदर दिले जात आहे. या योजनेतील गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आजपर्यंत या योजनेमध्ये लाखो लोकांनी गुंतवणूक केली आहे.

व्याज कसे मोजले जाते?

केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना चालवल्या जात आहेत. तसेच सरकारकडून पोस्टाच्या योजनांवर सर्वाधिक व्याजदर दिले जात आहे. किसान विकास पत्र योजनेचा परिपक्वता कालावधी 123 महिने होता.

मात्र जानेवारी 2023 मध्ये सरकारकडून हाच कालावधी 120 महिन्यांपर्यंत आणला होता. तसेच योजनेचा कालावधी आता आणखी कमी करून 115 महिने करण्यात आला आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केलेले पैशांवरील व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत असतो.

किती व्याज मिळत आहे

किसान विकास पत्र योजनेमधील गुंतवणुकीवर सरकारकडून 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात आहे. या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

या योजनेतील जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही या योजनेचे खाते उघडून यामध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला नॉमिनीचा पर्याय देखील दिला जाईल.

खाते कसे उघडायचे?

तुम्हालाही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्याआधी तुम्हाला या योजनेसाठी खाते उघडावे लागेल. तुम्ही या योजनेमध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते उघडू शकता.

जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे खाते सहज उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्ज करू शकता. गुंतवणुकीची रक्कम तुम्हाला रोख, चेकमध्ये देऊ शकता.

तसेच अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्र देखील द्यावे लागेल. किसान विकास पत्र योजनेमध्ये सरकारकडून दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेतला जातो आणि त्यामध्ये बदल देखील केला जातो. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही एक सर्वोत्तम योजना आहे.