Post Office Scheme : बचतीसाठी भन्नाट योजना! 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 7 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : देशामध्ये नागरिकांना गुंतवणुकीसाठी अनेक सरकारी आणि खाजगी बँकाकडून बचतीसाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना कमी गुंतवणुकीवर अधिक फायदे मिळत आहेत. तसेच फसवणुकीचे गुन्हे वाढल्याने अनेक नागरिक गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात.

मात्र तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिसकडून तुमच्यासाठी अशा अनेक योजना सादर करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून बंपर नफा मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या बचत योजनेवर व्याजदर देखील चांगले दिले जात आहे. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे मानले जाते तसेच या पोस्टाच्या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही.

1 जुलै रोजी केंद्र सरकारने बचत ठेवीवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारकडून बचत योजनेवर ६.५० टक्के व्याज दिले जात आहे. त्यामुळे तुम्ही काही वर्षांसाठी गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

अशी आहे योजनेची गणना

जर तुम्ही देखील पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर दरमहा तुम्ही बचत योजनेमध्ये १० हजर रुपयांची गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. हे पैसे तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवावे लागतील.

५ वर्षानंतर तुम्हाला या योजनेतून 7,10,000 रुपये बंपर परतावा दिला जाईल. ५ वर्षांमध्ये तुम्ही या योजनेत ६ लाख रुपयांची गुंतवणूक कराल आणि तुम्हाला या गुंतवणुकीवर १ लाख १० हजार रुपयांचे व्याज दिले जाईल. या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेचे फायदे

तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल आवर्ती ठेव अंतर्गत गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकदार त्यांच्या ठेवींवर देखील कर्ज घेऊ शकतात, कर्जाचे व्याजदर RD खात्यावर लागू असलेल्या व्याजापेक्षा 2 टक्के जास्त असेल.

तुम्ही या योजेनची रक्कम भरण्यासाठी महिन्याची किंवा एकरकमी पर्याय निवडू शकता. जर तुम्ही या योजेनची रक्कम वेळेवर भरू शकला नाही तर तुमच्या खात्यातून व्याज कापले जाईल. तसेच जर तुम्हाला योजनेचा कालावधी वाढवायचा असेल तर तुम्ही आणखी ५ वर्षे या योजेनचा कालावधी वाढवू शकता.