Post Office Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या तयारीत आहात का? अहो मग कुठेही पैसा गुंतवण्यापूर्वी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरे तर अलीकडे भारताचे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. याचे कारण म्हणजे येथून मिळणारा परतावा हा एफडी किंवा इतर बचत योजनांपेक्षा खूपच अधिक आहे.
मात्र जेवढा जोरदार परतावा आहे तेवढीच रिस्क देखील हाय आहे. या ठिकाणी गुंतवलेल्या पैशांना सुरक्षितता नसते. म्हणजेच गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे लॉस मध्ये देखील जाऊ शकतो. यामुळे आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या योजनांना विशेष महत्त्व आहे.
जर सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट देखील यापैकीचं एक आहे. या टाईम डिपॉझिट योजनेला अनेक जण पोस्ट ऑफिस ची एफडी योजना म्हणून ओळखतात.
याचे कारण म्हणजे या योजनेचे स्वरूप हे एफ डी योजनेसारखेच आहे. यामुळे या योजनेला FD योजना म्हणून ओळखले जाते. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना
एफडीप्रमाणेच या योजनेत गुंतवणूकदारांना एकदा रक्कम गुंतवावी लागते. यानंतर त्या रकमेवर व्याज मिळत राहते. पोस्टाची ही योजना विविध कालावधीसाठी सुरू आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट योजनेतल्या गुंतवणुकीवर भिन्नभिन्न व्याज दिले जात आहे.
पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट योजनेबाबत बोलायचं झालं तर यावर पोस्टाकडून 7.5 टक्के या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. याशिवाय तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीमध्ये आयकर कायदा 80C अंतर्गत कर लाभ देखील मिळतो.
3,00,000 ची FD केल्यावर किती रिटर्न मिळणार
जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 3 लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त 7.5 टक्के व्याजदराने 1,34,984 रुपये फक्त व्याज म्हणून मिळणार आहेत. म्हणजेच तुम्ही गुंतवलेले तीन लाख रुपये आणि व्याज असे एकूण चार लाख 34 हजार 984 रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसची FD एक्सटेंड देखील करता येते. म्हणजे जर पाच वर्षांची एफडी योजना संपली असेल पण तुम्हाला आणखी काही काळासाठी ही गुंतवणूक तशीच ठेवायची असेल तर तुम्ही ही योजना आणखी पाच वर्षांसाठी एक्सटेंड करू शकतात.