आर्थिक

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना! दरमहा मिळेल भरघोस परतावा, अशी करा गुंतवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office Scheme : अनेकजण गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी आणि कमी वेळेत चांगला परतावा मिळावा, यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिसमधील योजनांच्या गुंतवलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते.

पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना सुरु करत असते. तुम्हाला पेन्शन म्हणून प्रत्येक महिना ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणुक करत आहेत. पोस्टाच्या या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते योजना.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत प्रत्येक महिन्याला तुम्ही पैसे गुंतवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गुंतवण्यात आलेले सर्व पैसे सुरक्षित राहतात. त्याशिवाय या योजनेत 5 वर्षांनी पूर्ण पैसे मिळतात. पोस्ट ऑफिसने संयुक्त आणि एकल दोन्ही खाती उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सध्या निवृत्तीनंतर या योजनेतून पेन्शन मिळू शकणारे असे अनेक लोक आहेत.

प्रत्येक महिन्याला मिळेल इतके उत्पन्न

आता या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये व्याजदर 6.7 टक्के केला आहे. आता तुम्ही त्याच्या सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसेच त्याच वेळी, तुम्ही संयुक्त खात्यावर 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. समजा तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केले असल्यास एका वर्षात 6.7% व्याजदरानुसार 1 वर्षाचे एकूण 60300 रुपये व्याज मिळू लागते. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5025 रुपये व्याज मिळणार आहेत. तर दुसरीकडे, 4.5 लाख रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2513 रुपये व्याज मिळेल.

मुलाच्या नावाने चालू करता येते खाते

हे लक्षात घ्या की हे खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने चालू केले जाऊ शकते. समजा तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते चालू केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे काही व्याज मिळेल ते तुम्ही मुलाच्या शाळेची फी जमा करू शकता.

असे चालू करा खाते

तुम्हाला हजारो रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते चालू करावे लागणार आहे. त्यासाठी 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, पत्ता पुरावा म्हणजे मतदार कार्ड, आधार कार्ड, डायव्हिंग लायसन्स इ. ही कागदपत्रे बाळगून POMIS फॉर्म भरावा भरावा लागणार आहे. तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता. त्याशिवाय फॉर्म भरण्यासोबतच नामनिर्देशित व्यक्तीचे नावही द्यावे लागणार आहे. हे खाते चालू केल्यानंतर या चेकद्वारे 1000 रुपये रोख जमा करावे लागणार आहेत.

Ahmednagarlive24 Office