आर्थिक

तुम्हालाही दरमहा 20 हजार रुपये कमवायचे आहेत का? मग पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा

Published by
Tejas B Shelar

Post Office Scheme : सरकारी नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. पण, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना तशी पेन्शन मिळतं नाही, तसेच उद्योग करणाऱ्या लोकांना देखील उतार वयात पैशांसाठी झगडावे लागते. यामुळे अनेकजण आयुष्याच्या संध्याकाळी, म्हातारपणी आपल्याकडेही पैशाचा स्रोत असावा म्हणून काही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात.

तसेच काहीजण बँकेच्या एफडी मध्ये पैसे गुंतवतात. पण आज आपण बँकेच्या एफडी योजनेपेक्षा अधिकचा परतावा देणाऱ्या बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल अशा लोकांसाठी ही बचत योजना फायद्याची ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला जबरदस्त परतावा मिळणार आहे. आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकरकमी पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी उत्पन्न मिळत राहणार आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूकदारांना दरमहा वीस हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.

कोणती आहे ही योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम. या स्कीम मध्ये ज्येष्ठ नागरिकांना पैसे गुंतवता येतात. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक यामध्ये पैसे गुंतवू शकतात.

या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेत नागरिकांना कमाल 30 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस कडून 8.2% या दराने व्याज दिले जात आहे. ही योजना पाच वर्षांची आहे.

म्हणजेच एकदा पैसे गुंतवलेत की पाच वर्ष सलग यातून व्याज मिळत राहणार आहे. आधी या योजनेत फक्त पंधरा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येत होती. मात्र सरकारने या योजनेत बदल करत आता गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

कसे मिळणार 20 हजार रुपये?

या योजनेतून जर तुम्हाला मासिक वीस हजार रुपयांची कमाई करायची असेल तर यासाठी तुम्हाला तीस लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. 30 लाख रुपये इन्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला वार्षिक 2 लाख 46 हजार रुपयांचे व्याज यामधून मिळणार आहे.

जर आपण मंथली व्याजाचा विचार केला तर हे व्याज 20500 रुपये एवढे होणार आहे. तुम्हाला 30 लाख रुपये गुंतवल्यानंतर वीस हजारापेक्षा अधिकची रक्कम व्याज म्हणून मिळणार आहे.

या योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक गुंतवणुकीसाठी पात्र ठरत असले तरीदेखील ज्यांनी 55 ते 60 वर्ष असतांना स्वेच्छा निवृत्ती घेतलेली असेल ते लोकही गुंतवणूक करू शकतात.

टॅक्स द्यावा लागतो बरं

पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममधून मिळणाऱ्या उत्पन्नावर नागरिकांना कर भरावा लागतो. या सेविंग स्कीम मधून जर तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर टीडीएस भरावा लागणार आहे. परंतु जर तुम्ही फॉर्म 15G/15H भरला असेल तर व्याजावर TDS कापला जाणार नाही.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar