Post Office Scheme : भारतात फार आधीपासूनच गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवण्याच्या तयारीत असतो. मात्र बहुतांशी जनता सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असते. सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते.
बँकेची एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख विशेष फायद्याचा ठरणार आहे.
कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना पोस्टाच्या या योजनेतून दुप्पट परतावा मिळणार आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत एक लाख रुपये गुंतवलेत तर त्याला दोन लाख रुपये मिळणार आहेत आणि जर एखाद्याने दोन लाख रुपये गुंतवले तर त्याला चार लाख रुपये मिळणार आहेत.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना किसान विकास पत्र. किसान विकास पत्र ही फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली नाही. या योजनेत भारतातील सर्वच नागरिक गुंतवणूक करू शकतात.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत गुंतवणूक केली तर त्याला 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज मिळणार आहे. या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करता येते किंवा जॉइंट अकाउंट देखील ओपन केले जाऊ शकते.
विशेष म्हणजे दहा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अल्पवयीन मुलाचे देखील या योजनेत अकाउंट ओपन केले जाऊ शकते. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांना मात्र यामध्ये गुंतवणूक करता येणार नाही. फक्त भारतीय नागरिकचं या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
किती महिन्यात पैसे डबल होणार
तुम्ही किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करून तुमचा पैसा दुप्पट करू शकता. जर किसान विकास पत्रात नऊ वर्षे सात महिने कालावधीसाठी पैसे गुंतवलेत तर पैसे दुप्पट होतात.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत पाच लाख रुपये 115 महिन्यांसाठी गुंतवलेत तर सदर गुंतवणूकदाराला दहा लाख रुपये मिळणार आहेत.
किसान विकास पत्र योजनेचे अकाउंट ओपन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
जर तुम्हीही पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा पुरावा, किसान विकास पत्राचा एप्लीकेशन फॉर्म असे विविध कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागणार आहेत.