आर्थिक

50 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती ! गुंतवणूकदार अवघ्या 60 महिन्यात होणार मालामाल, कशी आहे योजना ?

Published by
Tejas B Shelar

Post Office Scheme : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. मात्र असे असले तरी बँकेची एफडी योजना तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये शेअर मार्केट पेक्षा अधिक गुंतवणूक होत असल्याचे चित्र आहे.

कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये यासाठी अनेकजण आजही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात. महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व देतात.

दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात सुरक्षित ठिकाणी तुमचा पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फायद्याचा ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.

आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेत दररोज 50 रुपये वाचवून गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला अवघ्या काही महिन्यातच चांगला मोठा फंड मिळणार आहे.

कशी आहे पोस्ट ऑफिसची आरडी योजना

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दरमहा गुंतवणूक करता येते. यावर पोस्ट ऑफिस कडून एक निश्चित परतावा दिला जातो. पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 6.70% या इंटरेस्ट रेट ने व्याज दिले जात आहे.

मात्र या योजनेवरील व्याजदर दर तीन महिन्यांनी सुधारित होत असतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी या योजनेचे व्याजदर बदलतात. सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 6.70 टक्के इंटरेस्ट रेटने व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेतून सध्या जे व्याज मिळत आहे ते बँकेच्या सेविंग अकाउंट वर दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा अधिक आहे. त्यामुळे सेविंग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्यापेक्षा जर लोकांनी या ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यांना चांगला फायदा मिळणार आहे.

दररोज 50 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवणार लखपती

जर या योजनेत दररोज 50 रुपये म्हणजेच महिन्याकाठी 1500 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी अर्थातच पाच वर्षात गुंतवणूकदारांना 1.07 लाख रुपये मिळणार आहेत.

अर्थातच अवघ्या पन्नास रुपयांची गुंतवणूक तुम्हाला पाच वर्षात लखपती बनवणार आहे.

विशेष बाब अशी की या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हणजे जर तुम्ही पाच वर्षांच्या आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करत असाल आणि मध्येच तुम्हाला पैशांची अडचण भासली तर तुम्हाला आरडी मध्ये गुंतवलेल्या गुंतवणुकीवर कर्ज मिळणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com