Post Office Scheme:- बरेच व्यक्ती काबाडकष्ट करतात व पैसे कमावतात. त्यामुळे बरेच व्यक्ती हे कमावलेल्या पैशांची बचत करतात व बचत चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची योजना आखतात. कमवलेले पैसे गुंतवताना प्रामुख्याने केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील का आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न अर्थात परतावा कसा मिळेल? याचा प्रामुख्याने विचार केला जातो.
जर आपण सध्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केला तर बरेच जण एलआयसी, म्युच्युअल फंड, तसेच बँकेत फिक्स डिपॉझिट यासारख्या पर्यायांचा विचार करतात. तसेच बरेच जण शेअर मार्केटचा पर्याय देखील अवलंबतात. परंतु गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या योजना देखील खूप महत्त्वपूर्ण आहेत.
पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना असून या योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीवर आकर्षक व्याज मिळतेच परंतु परतावा देखील उत्तम मिळतो. याच अनुषंगाने आपण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र नावाच्या योजनेबद्दल या लेखात माहिती घेणार असून ही एक महत्वपूर्ण योजना आहे व यामध्ये जर 115 महिने पैशांची गुंतवणूक केली तर पैसे चारपट होतात.
पोस्ट ऑफिसची फायद्याची किसान विकास पत्र योजना
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असून या योजनेमध्ये जर तुम्ही पैशांची 115 महिन्यांकरिता गुंतवणूक केली तर पैसे चार पट वाढतात. या योजनेमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी घेऊन लाभ मिळवू शकतात. किसान विकास पत्र योजना ही पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून देखील ओळखली जाते.
महत्वाचे म्हणजे सरकारच्या माध्यमातून या योजनेत पैसे गुंतवणूक केलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आलेली आहे. सात टक्के दराने किसान विकास पत्र योजनेमध्ये व्याज दिले जात होते. मात्र एक जुलै 2023 पासून यामध्ये वाढ करत ते साडेसात टक्केपर्यंत करण्यात आले आहे.
115 महिन्यांमध्ये कशाप्रकारे होतात पैसे दुप्पट?
सरकारने या योजनेतील गुंतवणुकीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात वाढ करून एक प्रकारे गुंतवणूकदारांचा फायदाच केलेला आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करण्याचा जो काही कालावधी होता तो देखील सरकारने कमी केला आहे.
जानेवारी 2023 मध्ये सरकारने किसान विकास पत्र योजनेचा कालावधी 120 महिन्यांपर्यंत कमी केला होता व या अगोदर 123 महिने इतका होता. या 120 महिन्यांमध्ये देखील सरकारने आता पाच महिने कमी केले असून पैसे दुप्पट करण्याचा कालावधी आता 115 महिने इतका करण्यात आला आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवरील व्याजदर हा चक्रवाढ आधारावर मोजला जातो.
या योजनेत किती करता येते गुंतवणूक?
किसान विकास पत्र योजनेमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक यामध्ये करू शकतात व यात दोनशे रुपयांची वाढ करत गुंतवणूक सुरू ठेवू शकतात. यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.परंतु जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.
त्यामुळे साहजिकच तुम्ही जितक्या जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक कराल तितका जास्तीचा नफा नागरिकांना मिळतो. तसेच या योजनेमध्ये संयुक्त आणि वैयक्तिक असे दोनही प्रकारचे खाते उघडता येणे शक्य आहे. समजा तुम्ही या योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर साडेसात टक्के व्याज तुम्हाला मिळेल. म्हणजेच 115 महिने अर्थात 9 वर्ष सात महिन्यानंतर पाच लाख गुंतवणुकीवर तुम्हाला 20 लाख रुपये इतका रिटर्न मिळेल.
किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना असली तरी दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने देखील यामध्ये खाते उघडता येते. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडणे गरजेचे आहे. योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी एक अर्ज तुम्हाला भरावा लागतो व गुंतवणुकीची रोख रक्कम, चेक किंवा डीडी जमा करणे गरजेचे असते व तुम्ही केलेल्या अर्जासोबत तुमच्या ओळखीचा पुरावा देणे गरजेचे असते.
योजना परिपक्व होण्याआधी खाते बंद करता येते का?
या योजनेचा जो काही कालावधी असेल तो पूर्ण होण्याआधी तुम्हाला खाते बंद करण्याची यामध्ये सुविधा मिळते. परंतु याकरिता तुम्हाला ही योजना सुरू केल्यापासून सहा महिन्यानंतर आणि दोन वर्षापर्यंत खाते बंद करता येते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर खातेदार एकच असेल व त्याचा अचानकपणे मृत्यू झाला तरी मुदतीपूर्वी तुम्ही खाते बंद करू शकतात.
अशाप्रकारे किसान विकास पत्र योजना ही पोस्ट खात्याची एक महत्त्वाची गुंतवणूक योजना असून नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.