आर्थिक

Post Office ची हमी योजना ! पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा पैसा गुंतवला की आयुष्यभर मिळणार परतावा, किती पैसे गुंतवता येतात ?

Published by
Tejas B Shelar

Post Office Scheme : तुम्हीही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये आपला पैसा ओतत असल्याचे दिसत आहे. नवयुवक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पण आजही सीनियर सिटीजन आणि महिलावर्ग सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

सीनियर सिटीजन आणि महिला वर्ग आजही मोठ्या प्रमाणात पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, बँकेच्या एफडी योजना यामध्ये आपला पैसा गुंतवत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एखाद्या सुरक्षित ठिकाणी पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर पोस्ट ऑफिसची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

या योजनेत तुम्हाला एकदा पैशांची गुंतवणूक करावी लागणार आहे आणि मग तुम्हाला आयुष्यभर एक फिक्स इन्कम मिळत राहणार आहे. येथे तुम्ही जेवढा पैसा गुंतवाल त्यानुसार तुम्हाला महिन्याकाठी व्याज मिळत राहणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेची संपूर्ण अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणती आहे ती योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे POMIS. ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे सिंगल आणि जॉईंट अशा दोन्ही प्रकारचे अकाउंट ओपन करता येते. म्हणजे जर पती-पत्नी दोघांना गुंतवणूक करायची असेल तरीही ही योजना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेत एकदाच पैसा गुंतवावा लागतो.

एकदा पैसा गुंतवला की या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळत राहणार आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर पोस्टाच्या माध्यमातून 7.4% या इंटरेस्ट रेटने गुंतवणूकदारांना परतावा दिला जात आहे. ही योजना पाच वर्षांच्या कालावधीसाठी असते. जर एखाद्याने सिंगल अकाउंट ओपन केले तर त्याला यामध्ये नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन केले तर यामध्ये 15 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवता येते.

या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेला आणखी मुदत वाढ देऊ शकता. जर तुम्हाला मुदत वाढवायची नसेल तर तुम्हाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमची मुद्दल परत केली जाईल. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक एक लाख 11 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे सदर गुंतवणूकदाराला महिन्याला 9250 रुपये एवढे व्याज मिळणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com